Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून शारीरीक संबंधाचे काढले व्हिडिओ; व्हायरल करण्याची धमकी देऊन उकळले  सव्वा लाख रुपये, मागितली 10 लाखांची खंडणी

Pune Crime News | Video of sexual intercourse made on the pretext of marriage; Threatened to make it viral, extorted Rs. 1.25 lakh, demanded a ransom of Rs. 10 lakh

पुणे : Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीबरोबर त्याने शारीरीक संबंध ठेवले. त्याचे नकळत फोटो, व्हिडिओ काढले. ते नातेवाईक व मित्रांना पाठवून बदनामी करण्याची धमकी देऊन नराधमाने सव्वा लाख रुपये घेतले. त्यानंतर तरुणीची बहिण व तिच्या पतीला हे व्हिडिओ, फोटो दाखवून त्यांच्याकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत एका ३१ वर्षाच्या तरुणीने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी वीरसेन धीरजकुमार रणशुंगारे Veersen Dhirajkumar Ranshungare (वय ३३, रा. बुधवार पेठ, मिलिंदनगर, सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १३ ऑगस्ट २०२३ ते ९ डिसेंबर २०२५ दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना वीरसेन रणशुंगारे याने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी त्यांच्या इच्छेविरुद्ध शारीरीक संबंध केले. या दरम्यान त्याने नकळत शारीरीक संबंधावेळीचे काढलेले व्हिडिओ व फोटो त्यांच्या नातेवाईक व मित्रांना पाठवून बदनामी करेल, अशी धमकी दिली. त्यांच्याकडून आतापर्यंत १ लाख २२ हजार रुपये धमकावून घेतले. वीरसेन रणशुंगारे याने हे व्हिडिओ व फोटो फिर्यादी यांची बहिण व तिचे पती यांना दाखवून त्यांना फिर्यादी यांना आणखी १० लाख रुपये द्या तर हा विषय संपवून टाकतो, नाहीतर ते मी व्हायरल करील अशी धमकी दिली. फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वीरसेन रणशुंगारे याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक गेले होते. परंतु, तो आजारी असल्याने रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समजले. पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल तपास करीत आहेत.

You may have missed