Pune Pimpri Crime News | पुणे : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरीत 7 पिस्तुले आणि 6 जिवंत काडतुसे जप्त; पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाची कारवाई
पुणे : Pune Pimpri Crime News | पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई करत अवैध शस्त्रसाठा जप्त केला आहे. तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सात पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली असून पाच सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस तपासात ही शस्त्रे धुळे जिल्ह्यातून पिंपरी–चिंचवडमध्ये आणल्याचे उघड झाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुहास उर्फ पिल्या बालाजी गायकवाड Suhas alias Pilya Balaji Gaikwad (वय- २७ वर्षे, रा. निसर्ग हौ. सोसा. घरकुल, पुणे), अभय विकास सुरवसे Abhay Vikas Suravase (वय- २७ वषे, रा. सुदर्शन नगर लेन नं. ०५, पिंपळे गुरव, पुणे), ओमकार सिद्धेश्वर बंडगर Omkar Siddheshwar Bandgar (वय- २१ वर्षें, रा. काळे प्लॉट गल्ली, उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव), समीर लक्ष्मण इजगज Sameer Laxman Ijgaj ( वय २७ वषै; रा. अक्षय बुचडे याचे भाड्याचे खोलीत, बुचडे चाळ, मारुंजी, पुणे) आणि धर्मेंद्र हरिप्रसाद सेन Dharmendra Hariprasad Sen (वय 25 वर्ष, धंदा मजुरी, राहणार सोलू, तालुका खेड, जि. पुणे) यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींवर यापूर्वीही हत्या, हत्येचा प्रयत्न, मारहाण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी केली आहे. . पहिल्या कारवाईत चौघांकडून चार पिस्तुले आणि तीन जिवंत काडतुसे, दुसऱ्या कारवाईत समीर इजगजकडून दोन पिस्तुले व दोन काडतुसे, तर तिसऱ्या कारवाईत धर्मेंद्र सेनकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. ही शस्त्रे कोणत्या उद्देशाने आणण्यात आली होती, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. आरोपींना आळंदी, वाकड आणि सांगवी पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. निवडणूक काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.
