Pune Crime News | अचानक सुमो थांबविल्याचा जाब विचारल्याने कोयत्याने भोसकून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांची खडकी पोलिसांनी काढली ‘धिंड’ (Video)
पुणे : Pune Crime News | रस्त्यात अचानक सुमो गाडी थांबविल्याने दुचाकीचालकाने जाब विचारल्याने चौघांनी कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. खडकी पोलिसांनी त्यातील तिघांना अटक करुन त्यांची खडकी परिसरात वरात काढली.
याबाबत किर्तीकुमार वसंत गवळी (वय ३३, रा. गवळीवाडा, खडकी) हे ८ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता दुध विक्री करुन दुचाकीवरुन घरी जात होते.
खडकीतील साईबाबा मंदिराजवळ सुमो अचानक मध्ये थांबली. तेव्हा गवळी यांनी जाब विचारला. सुमोमधील मलंग कुरेशी (वय २८), शाहीद कुरेशी (वय २५) व त्याच्या दोघा साथीदारांनी गाडीतून उतरत त्यांची अॅक्टीव्हा फोडली. मलंग कुरेशी याने गाडीतून हत्यार काढत हम यहाके भाई है, ज्यादा बोलेगा तो काट डालेगा, असे म्हणून हत्याराने गवळी यांच्यावर चार ते पाच वेळा वार करुन भोसकले. खडकी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन त्यातील तिघांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम, पोलीस निरीक्षक किरण गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक मुदस्सर पटेल, पोलीस उपनिरीक्षक रेखा दिघे, दिग्विजय चौगले व त्यांच्या सहकार्यांनी या तिघांची खडकी परिसरातून वरात काढून कोणी दहशत निर्माण करत असेल तर त्यांची काय अवस्था होते, हे सर्वांना दाखवून दिले.
