Pune Crime News | अश्लिल हावभाव व हातवारे करुन रस्त्यावरुन जाणार्या लोकांना आकर्षित करणार्या बुधवार पेठेतील ‘त्या’ महिलांवर फरासखाना पोलिसांनी केला गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | रस्त्याने जाणार्या येणार्या लोकांना स्वत:कडे आकर्षित करणार्या आणि सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण करणार्या बुधवार पेठेतील दोन महिलांवर फरासखाना पोलिसांनी अनैतिक मानवी व्यापारास प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
रात्री उशिरानंतर लक्ष्मी रोड परिसरात फुटपाथवर अनेक महिला उभ्या राहून रस्त्याने येणार्या जाणार्या लोकांना स्वत:कडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यासाठी जाणून बुजुन अंगविक्षेप, अश्लिल हावभाव व हातवारे करुन लोकांना आकर्षित करत असतात.
मुळच्या पश्चिम बंगालमधील ३१ व ३२ वर्षाच्या या महिला बुधवार पेठेमध्ये वेश्या व्यवसाय करतात. श्रीनाथ टॉकीज समोरील सार्वजनिक रोडवर १२ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजल्यानंतर शिवाजी रोडवर उभ्या राहून लोकांना आकर्षित करत होत्या. पोलिसांनी त्यांना अटकाव केला. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन नोटीस दिली आहे. पोलीस निरीक्षक नामवाडे तपास करीत आहेत.
