Revenue Department’s Work Stop Protest | तहसीलदारांच्या निलंबनाविरोधात महसूल विभागाचे बेमुदत कामबंद आंदोलनास सुरुवात

Revenue Department's Work Stop Protest | Revenue Department's indefinite work stop protest against suspension of Tehsildars

पुणे : Revenue Department’s Work Stop Protest |  विविध उद्घाटन, पायाभरणी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात असताना महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी बेमुदत कामबंद आंदोलनास सुरुवात केली आहे. त्यामुळे महसूल विभागातील सर्व कामावर परिणाम झाला आहे.  

नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात शुक्रवारी १२ डिसेंबर रोजी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी  मावळ तालुक्यातील गौण खनिज प्रकरणात राज्य सरकारने ४ तहसीलदार, ४ मंडळ अधिकारी व २ ग्राम महसूल अधिकार्‍यांना निलंबित केल्याची घोषणा केली होती. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील महसूल विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अधिकार्‍यांना विश्वासात न घेता त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांच्यावर अन्यायकारक पद्धतीने कारवाई करण्यात आली असून, याचा निषेध करत जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी व अधिकार्‍यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तालुका आणि गावपातळीवरील कामकाज ठप्प आहे. या आंदोलनात सुमारे अडीच हजार कर्मचारी अधिकारी सहभागी झाले आहेत.

You may have missed