Pune PMC Elections 2025-2026 | उमेदवारांना महापालिकेची नाहरकत प्रमाणपत्र घरबसल्या उपलब्ध होणार ! निवडणुका पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज – महापालिका आयुक्त नवल किशोर राम

Pune PMC Elections 2025-2026 | Candidates will be able to receive the municipal clearance certificate from home! Administration ready to conduct elections transparently - Municipal Commissioner Naval Kishore Ram

पुणे : Pune PMC Elections 2025-2026 | महापालिका निवडणुकिचा कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणूक यंत्रणेने तयारीला सुरुवात केली आहे. उमेदवारी अर्ज भरताना लागणारी महापालिकेची ना. हरकत प्रमाणपत्र प्रथमच ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महापालिकेची कुठलीही थकबाकी नसलेल्या अर्जदारांना अवघ्या चोवीस तासात ना हरकत प्रमाणपत्र घरबसल्या डाऊन लोड करता येणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यात येईल असा दावा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केला आहे.

पुण्यासह राज्यातील तब्बल २९ महानगरपालिकांच्या रखडलेल्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. १५ जानेवारी रोजी मतदान, तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी व अंतिम निकाल जाहीर होणार आहेत. या संदर्भात पुणे महापलिकेच्या निवडणूक यंत्रणेने काय तयारी केली आहे याची माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी माध्यमांना दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, निवडणूक अधिकारी व उपयुक्त प्रसाद काटकर, उपयुक्त रवी पवार उपस्थित होते.

आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, निवडणूकीची आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. आचार संहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी निवडणूक संनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांचा समावेश करण्यात आला आहे. निवडणुकच्या काळात घडणाऱ्या महत्वाच्या घटना, प्रचार फेऱ्या, सभा तसेच उमेदवारांच्या खर्चाबाबत व्हिडिओग्राफी सर्व्हेलन्स पथक तयार करण्यात आले आहे. तसेच भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मतदारांना प्रलोभने किंवा प्रभाव पाडणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चेक पोस्ट पथक तयार करण्यात आले आहे. तर तक्रारींचे निवारण करण्यासाठी देखील महापालिका स्तरावर किंवा प्रभागनिहाय स्तरावर आचार संहिता भंगांच्या तक्रार निवरणासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करतांना थकबाकी नसल्याच्या दाखल्याची व ना हरकत प्रमाण पत्राची (एनओसी) गरजेची असते. उमेदवारांचा हा दाखला घेण्यासाठी वेळ जाऊ नये यासाठी ही सोय ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी अर्ज करतांना आधार कार्ड, मतदार व प्रॉपर्टी नंबर nocelection.pmc.gov.in या संकेत स्थळावर अपलोड करावे लागणार आहे. त्यानंतर महापालिकेच्या सर्व विभागात ऑनलाइन पद्धतीने कुठल्या विभागाची थकबाकी नाहीना याची पडताळणी करण्यात येईल. जर थकबाकी असेल तर उमेदवारला थकबाकी भरावी लागले. यानंतर २४ तासांच्या आत थकबाकी नसल्याचे प्रमाण पत्र या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे. या सह सावरकर भवन येथे देखील एनओसी देण्यासासाठी पाच अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती आयुक्त राम यांनी दिली.

संवेदनशील केंद्रावर सीसीटीव्हीची नजर

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तब्बल ४ हजार मतदान केंद्र उभारले जाणार आहेत. यातील किती केंद्र संवेनशील आहेत ? या बाबत पोलिस आयुक्त यांच्याशी बैठीक घेऊन त्यांच्या कडून यादी आल्यावर त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार सीसीटीव्ही बसवण्यात येईल. साधारणत: १० टक्के संवेनदशील मतदान केंद्र असू शकतात, असे आयुक्त राम यांनी सांगितले.

मतदानासाठी पुरेसे इव्हीएम मशीन

महापालिकेच्या निवडणुकीसाठी पुरेशा प्रमाणात ईव्हीएम मशीन उपलब्ध आहेत. १३ हजार २०० बॅलेट युनिट तर ४ हजार ४०० कंट्रोल युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ईव्हीएमची कमतरता पडणार नाही, असे आयुक्त म्हणाले.

मतदान वाढीसाठी करणार प्रयत्न

निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मतदान वाढीसाठी मतदान जन जागृती कार्यक्रम राबवण्यात येईल. गेल्या निवडणूकिट ५५ टक्के मतदान झाले होते. यात वाढ करण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे आयुक्त राम म्हणाले.

कागद पत्रांसाठी एक खिडकी यंत्रणा

निवडणूक प्रक्रियेत अनेक कागद पत्रांची गरज असते. ही कागद पत्रे तातडीने मिळावी यासाठी एक खिडकी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. कागद पत्रे मिळवंतांना अनेकांची दमछाक होत असते. मात्र, सर्व कागद पत्रे एकाच ठिकाणी देण्यासाठी एकाच ठिकाणी यंत्रणा उभारण्यात आली आहे.

You may have missed