Pune Crime News | पुणे : पिंपरीतील भाड्याच्या फ्लॅटमध्ये केली जात होती हायड्रोफोनिक गांजा शेती ! पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, गोवा येथे छापेमारी; पावणे चार कोटींचे अंमली पदार्थ जप्त, ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे ‘ऑपरेशन अलकनिरंजन’

Pune Crime News | Pune: Hydroponic Cannabis Farm Found in Rented Flat in Pimpri; Raids Across Pune, PCMC, Mumbai & Goa, Drugs Worth Nearly ₹4 Crore Seized Under ‘Operation Alkaniranjan’

पुणे : खडकी येथे गांजा विक्री करताना पकडलेल्या एका पेडलरवरुन गांजाचा मुळ शोधण्याचा प्रयत्नात पोलिसांनी आपल्याजवळच म्हणजे पिंपरीमध्ये भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये चक्क हायड्रोफोनिक गांजा शेती केली जात असल्याचे आढळून आले. पुणे पोलिसांनी पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई व गोवा येथे छापेमारी करुन ५ जणांना अटक करुन त्यांच्याकडून पावणे चार कोटींचा अंमली पदार्थ जप्त केला आहे़. तसेच विविध बँकेतील खाती, क्रिप्टो व्होलेट व फॉरेन करन्सीयामधून ७ लाख ८० हजार रुपयांची रक्कम गोठविण्यात आली आहे.

https://www.instagram.com/reel/DSXQsxECdxK/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

याबाबत पोलीस उपायुक्त सोमय मुंडे आणि पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी माहिती दिली़. या गुन्हेगारांनी डॉक नेटवर्कवर आपली ओळख लपविण्यासाठी त्याला अलकनिरंजन असे नाव दिले होते. त्यावरुन पोलिसांनी या कारवाईला ‘ऑपरेशन अलकनिरंजन’ असे नाव दिले होते.

खडकी पोलिसांना पेट्रोलिंग करताना तुषार चेतन वर्मा Tushar Chetan Varma (वय २१, रा. दिल्ली सध्या रा. सुसगाव) हा मिळून आला. त्याच्याकडून १ किलो १९४ ग्रॅम गांजा, इलेक्ट्रॉनिक काटा जप्त करुन एनडीपीएस अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला. तुषार वर्मा याच्याकडे चौकशी करता त्याने सुमित डेडवाल आणि अक्षय महेर या दोघांकडून अंमली पदार्थ आणत असल्याचे सांगितले. त्यावरुन सुमित संतोष डेडवाल (Sumit Santosh Deadwal) आणि अक्षय महेर यांना सांगवी येथून पकडण्यात आले. त्यांनी सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी स्वत: चौकशी करुन महत्वाची माहिती उघडकीस आणली.

या आरोपींनी पिंपरी चिंचवडमधील दाट वस्तीच्या भागात एक फ्लॅट भाड्याने घेऊन त्यामध्ये सॉईल बेस्ड हायड्रोफोनिक वजी कुश गांजा शेतीचा प्लँटच उभारलेला दिसून आला. पोलिसांनी ही गांजा शेती उद्धवस्त करुन प्लॉटचे साहित्य, रोपे आणि तयार माल जप्त केला. त्यानंतर तांत्रिक पद्धती वाढवत मुंबई व गोवा येथे छापे टाकले. यात मलय राजेश देलीवाला हा महत्वाचा आरोपी मिळून आला. त्याच्याकडून ९ प्रकारचे अंमली पदार्थ (गांजा ओ जी कुश, गांजा, चरस, एम डी, सायकॅटिक मशरुम, एल एस डी पेपर, कॅनॅबीस, गमीज, एम ए एम डी पिल्स, सी बी डी ऑईल) मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला. या अवैध व्यवसायासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य, त्यामध्ये वजन काटे, नोटा मोजण्याचे मशीन , सिलबंध करण्यासाठीच्या बॅगा इतर साहित्य जप्त करण्यात आले.

या आरोपींकडे तपास केल्यावर त्यांचा देशातील आणि परदेशातील पेडलर नेटवर्कला पुरवठा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीशी सरळ जोडलेले आहेत. त्याकरीता त्यांनी हवाला क्रिप्टो करन्सी ट्रान्झॅक्शन याचा उपयोग केला आहे. त्यांच्या गुन्हेगारी नेटवर्कचा माग काढण्याचे काम तपास अधिकारी करीत आहे.

तुषार चेतन वर्मा (वय २१, रा. दिल्ली, सध्या, सुसगाव), सुमित संतोष डेडवाल (वय २५, रा. मधुबन कॉलनी, जुनी सांगवी, मुळ रा. गंगापूर, संभाजीनगर), अक्षय सुखलाल महेर Akshay Sukhlal Maher (वय २५, रा. एक्सर्बिया टाऊनशिप, हिंजवडी, मुळ रा. गंगापूर, संभाजीनगर), मलय राजेश डेलिवाला Malay Rajesh Deliwala (वय २८, रा. अमृतनगर सर्कल, घाटकोपर पश्चिम, मुंबई) आणि स्वराज अनंत भोसले Swaraj Anant Bhosale (वय २८, रा. कुर्ला, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहे.

या कारवाईत एकूण सुमारे ३ कोटी ४५ लाख रुपयांचा अंमली पदार्थ व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून राज्य, आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय वितरण साखळी स्पष्टपणे उघड झाली आहे. ही संपूर्ण मोहीम पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम, पोलीस निरीक्षक किरण गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक मुदस्सर पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथक यांनी फॉरेन्सिक टीमच्या सहकार्याने निर्णायक भूमिका बजावली. तसेच बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस अंमलदार भोरे, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्ष सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नाईक, पोलीस अंमलदार जाधव तसेच दिनेश मरकड, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, पोलीस अंमलदार विराज शिंदे (साहारा पोलीस ठाणे), पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे व त्यांचे सहकारी आणि खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख व त्यांचे सहकारी यांनीही महत्वाचे योगदान दिले आहे.

You may have missed