Pune Crime News | मनोरुग्ण असलेल्या तरुणीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन नातेवाईक असलेल्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार; खडकी पोलिसांनी नराधमाला केली अटक

Pune Crime News | Taking advantage of the helplessness of a mentally ill young woman, a relative of the perpetrator committed sexual assault; Khadki police arrested the perpetrator

पुणे : Pune Crime News |  लहानपणापासून मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या तरुणीच्या असहाय्यतेचा गैरफायदा तिच्या नातेवाईक असलेल्या नराधमाने घेतला. तिला मारुन टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खडकी पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे.

अफराज जाफर शेख Afraz Jaffer Shaikh (वय २०, रा. दर्गा वसाहत, खडकी) असे या अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.

याबाबत या तरुणीच्या ६८ वर्षाच्या आईने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मार्च २०२५ ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान वेळोवेळी घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी लहानपणापासून मानसिकदृष्ट्या आजारी आहे. सध्या ती ३९ वर्षाची आहे. ती मनोरुग्ण असल्याची माहिती असतानाही अफराज शेख याने त्याच्या वयाच्या दुप्पट वयाने असलेल्या या तरुणीच्या मानसिक आजारपणाचा गैरफायदा घेतला. तिच्याकडून घेतलेले पैसे तिला परत देण्याच्या बहाणा करुन तो त्यांच्या घरी येत असे.

जवळच्या नातेवाईकांचा मुलगा असल्याने तिच्यापेक्षा तो खूप लहान असल्याने कोणी त्याच्यावर संशय घेतला नाही. मार्च २०२५ मध्ये त्याने तिच्याबरोबर शारीरीक संबंध ठेवले.  जर कोणाला सांगितले तर मारुन टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने वारंवार तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर या तरुणीने हा प्रकार आता आपल्या आईला सांगितला.  त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक पटेल तपास करीत आहेत.

You may have missed