Dr. Chandrakant Pulkundwar | विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली विजयस्तंभ परिसराची पाहणी

Dr. Chandrakant Pulkundwar | Divisional Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar inspected the Vijaystambh area.

पुणे : Dr. Chandrakant Pulkundwar | हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथे 1 जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पुर्व तयारीची विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विजयस्तंभ परिसरास भेट देऊन पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल, समाज कल्याणच्या आयुक्त दीपा मुंडे, बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,  जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी चंद्रकांत वाघमारे, पुणे ग्रामीण पोलीस उपायुक्त  हिम्मत जाधव, समाज कल्याण उपायुक्त वंदना कोचुरे, सहाय्यक आयुक्त तथा बार्टीचे निबंधक विशाल लोंढे, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, तहसीलदार तृप्ती कोलते,लोणीकंदचे पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार, यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी  वाहनतळ व इतर व्यवस्थेसंबंधी ठिकाणांना भेट देऊन तेथील तयारीचा आढावा घेतला. विजयस्तंभ परिसरात नियोजनाशी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या.

यावेळी पोलीस विभाग आणि विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी, विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

You may have missed