Pune Crime News | घरकाम करणार्‍या महिलेचा विनयभंग करणार्‍या नराधम डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime News | Case registered against manipulative doctor for molesting housemaid

पुणे : Pune Crime News | घरी कामासाठी येणार्‍या महिलेला कोणत्या ना कोणत्या कारणावरुन स्पर्श करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न करणार्‍या नराधम डॉक्टराविरुद्ध कोंढवा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. साजीद शेख Dr Sajid Shaikh Kondhwa (रा. ग्रीन एकर्स सोसायटी, कोंढवा) असे या डॉक्टराचे नाव आहे. याबाबत एका ३० वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ७ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२५ दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या डॉ. साजीद शेख यांच्या घरी काम करत असताना ते नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन फिर्यादी यांना स्पर्श करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असत. फिर्यादी यांनी त्याला विरोध केला असता डॉ. शेख याने फिर्यादी यांना कामावरुन काढण्याची धमकी दिली.

फिर्यादी या डॉ. साजीद शेख याच्या घरी दुध व पाणी घेऊन गेल्या होत्या. यावेळी दारातूनच त्या या वस्तू देऊ लागल्या. तेव्हा डॉ. साजीद शेख याने त्यांचा हात पकडून स्वत:चे ओठांवर जीभ फिरवून ओठ दातामध्ये घेऊन फिर्यादी यांना घरात ओढण्याचा प्रयत्न करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल,असे वर्तन केले. सहायक पोलीस निरीक्षक अमित कुंभार तपास करीत आहेत.

You may have missed