Pune Crime News | शारीरीक संबंध ठेवून 4 वेळा करायला लावला गर्भपात, लग्नास नकार देऊन दुसर्‍या तरुणीबरोबर दिसला फिरताना, बाणेर पोलिसांनी तरुणाला केली अटक

Arrest (4)

पुणे : Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीबरोबर शारीरीक संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिल्यावर तिला ४  वेळा गर्भपात करायला लावला. त्यानंतर आता तो दुसर्‍या तरुणीबरोबर फिरत असल्याचे दिसल्याने या तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.

शिवेंद्रकुमार सुरेंद्रकुमार सिंग Shivendrakumar Surendrakumar Singh (वय ३३, रा. सफरॉन अंबर सोसायटी, सुस, मुळ रा. बिहार) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याबाबत एका २८ वर्षाच्या तरुणीने बाणेर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ मार्च २०२४ ते १७ डिसेंबर २०२५ दरम्यान सुरु होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवेंद्रकुमार याने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले. त्यातून ही तरुणी एक, दोनदा नव्हे तर चार वेळा गर्भवती राहिली. त्याने तिला ४   वेळा गर्भपात करायला लावला. त्यानंतर शिवेंद्रकुमार हा दुसर्‍या तरुणीबरोबर फिरत असल्याचे या तरुणीने पाहिले. तिने शिवेंद्रकुमार याला जाब विचारल्यावर त्याने तिला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तुला काय करायचे ते कर मी बघुन घेतो, अशी धमकी दिली. प्रेम केले तोच असा विश्वासघातकी निघाल्याचे पाहून या तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. बाणेर पोलिसांनी त्याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक लामखडे तपास करीत आहेत.

You may have missed