Pune Crime News | घरात आई नसल्याचा गैरफायदा घेऊन तरुणाने 17 वर्षाच्या युवतीला लग्नाचे आमिष दाखवून केला लैंगिक अत्याचार
पुणे : Pune Crime News | जवळ राहणार्या ओळखीच्या तरुणाच्या आईला भेटण्यासाठी त्याच्या घरी १७ वर्षाची युवती गेली असताना घरात आई नसल्याचा गैरफायदा घेऊन लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अभिषेक सुधाकर साळवे Abhishek Sudhakar Salve (वय २२, रा. नर्हे, मुळ रा. कवडगाव, ता. वडवणी, जि. बीड) याच्यावर नर्हे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना नर्हे येथे १७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता घडली. याबाबत युवतीच्या आईने नर्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित युवती नर्हे येथे रहाते. ती अभिषेक साळवे याच्या आईला भेटायला त्यांच्या घरी गेली होती. त्यावेळी घरात आई नव्हती. अभिषेक याने ही संधी साधून या युवतीला “माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे,” असे म्हणून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. हे कोणाला सांगितले तर तुझ्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी त्याने दिली. पोलीस उपनिरीक्षक मालुसरे तपास करीत आहेत.
