Gold-Silver Price Today | सोन्याची झेप थांबेना; चांदीत जोरदार तेजी, गुंतवणूकदारांना दिलासा, आजचा भाव किती?

Gold

पुणे :  Gold-Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होत आहे. सध्या लग्नसराई सुरू असल्यामुळे ग्राहकांची सराफा बाजारात गर्दी होत आहे. सोमवारी, २२ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव सुमारे ०.७५ टक्के वाढून प्रति औंस ४३८७.०२ रुपये या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. तर चांदीचा भाव २.३० टक्क्यांनी वाढून प्रति औंस ६८.८४ पोहोचला आहे.

या वाढीचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात आणखी कपात होण्याची अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात, फेडने व्याजदरात ०.२५% कपात करून बाजाराला आणखी दिलासा दिला. शिवाय, कमकुवत डॉलरनेही सोन्याला आधार दिला. सोने हा एक पारंपरिक सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो. २०२५ मध्ये आतापर्यंत त्याच्या किमतीत अंदाजे ६७% वाढ झाली आहे. भू-राजकीय आणि व्यापारी तणाव, मध्यवर्ती बँकांकडून जोरदार खरेदी आणि पुढील वर्षी व्याजदर कपातीची अपेक्षा ही या तेजीमागील प्रमुख कारणे आहेत. कमकुवत डॉलर निर्देशांकाचा फायदाही सोन्याला झाला आहे, ज्यामुळे ते परदेशी गुंतवणूकदारांसाठी स्वस्त झाले आहे.

वायदा बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतींनी खळबळ उडवून दिली आहे. सोन्याच्या वायद्याची किमत सध्या १,३५,१११ रुपये असून, त्यात आज ९०० रुपयांची वाढ झाली आहे. तर, आज चांदीच्या वायद्याच्या किमतीने बाजारात वर्चस्व गाजवले आहे. चांदीच्या वायद्याची किमत २,१२७,७३ रुपये आहे. चांदीच्या किमतीत आज तब्बल ५,११९ रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या किमतीने आज विक्रमी वेग पकडल्याचे दिसत आहे.

दरम्यान, सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव १,२२,९०० रुपये आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव १,३४,१७० रुपये आहे. सराफा बाजारात सोन्याच्या दरांना गती मिळाली आहे. एक किलो चांदीचा भाव २,१३,९०० रुपये आहे. वर्षाच्या अखेरीस चांदीच्या भावाने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आता नवीन वर्षात चांदीच्या दरांना आणखी किती गती मिळते, त्यात किती वाढ होते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

You may have missed