Pune Pimpri Crime News | बनावट मोबाईल अॅक्सेसरीजची विक्री करणार्या 7 दुकानदारांवर गुन्हा दाखल करुन साडेपाच लाखांचा माल पोलिसांनी केला जप्त
पुणे /पिंपरी : Pune Pimpri Crime News | नथिंग इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीचे बनावट अॅक्सेसरीजची विक्री करणार्या ७ दुकानांवर पोलिसांनी छापे टाकून तेथून एअर बड्स, पावर चार्जर, मोबाईल कव्हर, केबल असा ५ लाख ५२ हजार ८१० रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलिसांनी ७ दुकानदारांवर कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत कंपनीचे फिल्ड ऑफिसर महेंद्र सोहमसिंग देवडा (वय ३८, रा. नाना पेठ) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी जोयताराम केसाजी चौधरी Joytaram Kesaji Choudhary (वय ४०, रा. काटेमळा, पिंपळे सौदागर), क्रिष्णाराम अमरराज घांची
Krishnaram Amarraj Ghanchi (वय २८, रा. यशदा फ्लोरंजा, पिंपरी गाव), सेनाराम जपुराराज पटेल Senaram Japuraraj Patel (वय ४०, रा. नखाते वस्ती, रहाटणी), प्रतापभाई देवजीभाई प्रजापती Pratapbhai Devjibhai Prajapati (वय ४२, रा. स्टोनराईज सोसायटी, पिंपरीगाव), धुकाराम सजोनाराम चौधरी Dhukaram Sajonaram Choudhary (वय २५, रा. नलिनी हाईटस, पिंपरी), मोहबताराम पिराराम चौधरी Mohabbataram Piraram Choudhary (वय २६, रा. शरयु निलय, पिंपरी गाव), सुमित सच्चानंद दुंबानी Sumit Sachchanand Dumbani (वय ३४, रा. सिल्वर क्रिस्टल, थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ब्रॉन्ड प्रोटेक्टर्स इंडिया या कंपनीत फिल्ड ऑफिसर म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या नथिंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे कॉपीराईट व ट्रेडमार्क कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचे अधिकार आहेत. कंपनीचे बनावट एअर बड्स, चार्जर, केबल, मोबाईल डिसप्ले व डिसप्ले ग्लास इत्यादीची विक्री पिंपरीतील डिलक्स चौकातील विविध दुकानामध्ये होत आहे. त्यानंतर त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांची भेट घेऊन त्यांना कारवाईबाबत विनंती अर्ज दिला. त्यावेळी ब्रॉन्ड प्रोटेक्टर इंडियाचे संचालक धिरेंद्रसिंग हिम्मसिंग उपस्थित होते. पिंपरी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार आर पवार, हवालदार इंगोले, पोलीस अंमलदार काकड, वाघमारे यांनी वेगवेगळ्या मोबाईल शॉपवर छापे टाकले.
त्यात जोयताराम चौधरी यांच्या रामेश्वर मोबाईल शॉपमधून ५० हजार ७५० रुपयांचा बनावट माल जप्त केला. किशनाराम घांची याच्या शिवबाबा टेलिकॉम शॉपमधून ८६ हजार ३७५ रुपयांचा माल, सेनाराम पटेल याच्या सूर्या मोबाईल शॉपमधून १ लाख १२ हजार २७० रुपयांचा बनावट माल, प्रतापभाई प्रजापती याच्या नागेश्वर मोबाईल अॅक्सेसरीजमधून २७ हजार ९८० रुपयांचा बनावट माल, धुकाराम चौधरी याच्या श्री चामुंडा स्पेअरपार्ट या दुकानातून ८ हजार रुपयांचा माल तसेच मोहबताराम चौधरी याच्या हरे कृष्णा मोबाईल शॉपमधून १ लाख २१ हजार ३०० रुपयांचा बनावट माल, सुमित दुंबानी याच्या रुद्रा मोबाईल या दुकानातून १ लाख ४६ हजार १३५ रुपयांचा असा एकूण ५ लाख ५२ हजार ८१० रुपयांचा बनावट माल पोलिसांनी जप्त केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग तपास करीत आहेत.
