Satish Bahirat | एकनिष्ठ कार्यकर्ता कसा असावा…सतीश बहिरट सारखा असावा; यंदा तरी निष्ठावंतांना न्याय मिळेल का?

Bahirat

पुणे : Satish Bahirat | २०१७ साली झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून तत्कालीन शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष सतीश बहिरट यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ- वाकडेवाडी (प्रभाग क्रमांक ७) येथून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पक्षाकडून त्यांना ए बी फॉर्मही देण्यात आला होता. त्यानुसार सतिश बहिरट यांनी अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्जही दाखल केला होता. त्यानंतर पक्षातील नव्या घडामोडीतून पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांना उमेदवारी अर्ज मागे येण्यास सांगितले. वरिष्ठांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्याचक्षणी आपली अधिकृत उमेदवारी मागे घेतला. प्रभाग ७ मधील भाजपचे चारही उमेदवार तेव्हा विजयी झाले होते. सतिश बहिरट हे तेव्हाच नगरसेवक झाले असते.

पक्षाचा आदेश मानत बहिरट यांनी कोणतीही नाराजी न दाखवता माघार घेतली. पक्षाने दुसर्‍याला उमेदवारी दिली. तरीही नाराज न होता सतीश बहिरट यांनी पक्षनिष्ठा अबाधित ठेवत प्रभागातील सर्व भाजप उमेदवारांचा प्रचार केला.  पुणे शहरातलं सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेलं शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ हा एकमेव प्रभाग ठरला. प्रभागातून भाजपचे सर्व उमेदवार  विजयी झाले. पक्षाच्या या यशानंतर सतीश बहिरट  यांची एकनिष्ठा पाहून भविष्यात मोठी जबाबदारी किंवा संधी मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, प्रत्यक्षात गेल्या ८ वर्षात सतीश बहिरट यांना कोणतीही मोठी संधी देण्यात आली नाही.

सतीश बहिरट हे सुरुवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत आले आहेत. १९८९ पासून ते भारतीय जनता पक्षात सक्रीय आहेत. संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव असलेल्या बहिरट यांना आगामी महापालिका निवडणुकीत गोखलेनगर – वाकडेवाडी (प्रभाग क्रमांक ७) येथून उमेदवारी मिळेल, असा विश्वास पक्षातील कार्यकर्त्यांना वाटत आहे. प्रभागातील चार पैकी दोन जागा या सर्वसाधारण खुल्या गटासाठी असल्याने बहिरट यांना अनुकूल अशी परिस्थिती असल्याचे  प्रभागात बोलले जात आहे.

महापालिका निवडणुकीची चाहूल लागल्यावर भारतीय जनता पक्षाच्या विजयाची सर्वाधिक संधी असल्याचे पाहून विविध पक्षातून भारतीय जनता पक्षात येणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपत कार्य करणार्‍या सर्वसामान्य कार्यकर्त्याला यावेळी तरी भाजप न्याय देणार का?, असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात उपस्थित झाला आहे. त्यामुळे गोखलेनगर -वाकडेवाडी (प्रभाग ७) मधून भारतीय जनता पक्ष कोणाला उमेदवारी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You may have missed