Pune PMC Elections | प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न
पुणे : Pune PMC Elections | प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित भव्य कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यास कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस आणि म्हाळुंगे परिसरातील असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यात प्रभाग क्रमांक ९ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार गायत्री मेढे–कोकाटे (अ गट), बाबुराव चांदेरे (ब गट), पार्वती निम्हण (क गट) आणि अमोल बालवडकर (ड गट) यांच्या नेतृत्वाखाली आगामी महापालिका निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर अधिक ताकदीने लढवण्याचा ठाम संकल्प करण्यात आला.
मेळाव्यात प्रभागातील मूलभूत प्रश्न, आतापर्यंत झालेला विकास, पुढील विकासाची दिशा तसेच जनतेशी थेट संवाद यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. चारही अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत एकजुटीने, शिस्तबद्ध आणि आक्रमक पद्धतीने प्रचार करण्याचा निर्धार प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर दिसून आला.
हा मेळावा केवळ बैठक न राहता, प्रभाग क्रमांक ९ मधील बदलाची ठोस सुरुवात ठरला. कार्यकर्त्यांची ताकद, जनतेचा विश्वास आणि विकासाची ठोस कामगिरी यांच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभागात विजयाची नवी आणि मजबूत कथा लिहिणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
