Pune PMC Elections | अजितदादा आले अन माहौल गेला बदलुन; प्रभाग 13 मध्ये वारं फिरलय़… घड्याळ ठरलंय..

Pune PMC Elections | Ajitdada came and went, changing the atmosphere; The wind has turned in Ward 13... The clock has ticked..

पुणे : Pune PMC Elections | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या झंझावती पुणे शहर दौर्‍यात रॅली आणि प्रचार सभांचा धडाका लावून संपूर्ण शहरातील माहोल बदलून टाकला. पुणे शहरातील वातावरणच आपल्या दौर्‍यांनी अजितदादा पवार यांनी बदलले.

https://www.instagram.com/p/DTR-pP5iUed

भवानी पेठेत झालेल्या प्रचार सभेत अजित पवार यांनी विकारअहमद शेख यांच्या सामाजिक कार्याचे आणि जनसंपर्काचे कौतुक केले.

अजितदादा पवार यांनी सांगितले की, प्रभागातील सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याची क्षमता विकारअहमद शेख यांच्याकडे आहे. विकास, विश्वास आणि सर्वसामावेशक नेतृत्व यासाठी विकारअहमद शेख हे योग्य उमेदवार आहेत. येणार्‍या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पॅनेल आणि विकारअहमद शेख यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्तार शेख यांचे अजित पवार यांच्याशी बोलणे झाले. प्रभाग क्रमांक १३मधील कामाचा कार्यअहवाल अजित पवार यांनी पाहिला. कार्यअहवाल पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. सोबत प्रभागात सुरु असलेली आणि रखडेली विकास कामे याबाबत त्यांच्यात चर्चा झाली. येणार्‍या काळात माझा मुलगा विकारअहमद मुख्तार शेख हे आपल्या पक्षाचे काम पुढे नेतील, असा विश्वास मुख्तार शेख यांनी अजित पवार यांना दिला.

अजित पवार यांच्या सभेनंतर विकारअहमद शेख यांच्या प्रचार रॅली आणि पदयात्रांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद वाढला आहे. शेख यांनी लेडील क्लब, गारपीर आणि पोलीस लाईन्स भागात पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला. लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर ताबडतोब उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले.