Pune Crime News | स्वसंरक्षणासाठी गावठी कट्टा बाळगणार्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | अल्पवयीन असताना केलेल्या गुन्ह्यातून आपल्याला हल्ला होईल, या भितीने स्वसरंक्षणासाठी शस्त्र बाळगणार्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडून त्याच्याकडून गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे.
अभिषेक कैलास दांगट Abhishek Kailash Dangat (वय १९, रा. वृंदावन विश्व, तानाजी नवले इंडस्ट्रीज नऱ्हे रोड) असे या आरोपीचे नाव आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक ८ जानेवारी रोजी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नवले पुलाकडून कात्रजकडे येणार्या मुख्य रोडवरील राजमाता उदयानसमोरील बाजुच्या सर्व्हिस रोडवर एक जण शस्त्र घेऊन थांबला आहे. या बातमीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व त्यांच्या सहकार्यांनी तेथे जाऊन शोध घेतला. अभिषेक दांगट याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून ५० हजार रुपयांचे गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात त्याविरुद्ध आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, अण्णा दराडे, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेशा बारवकर, मंगेशा पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांनी केली आहे.
