Pune PMC Elections | पुणे महापालिका निवडणूक: प्रभाग 11 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या कोपरा सभा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Pune PMC Elections | Pune Municipal Elections: NCP candidates hold a corner meeting in Ward 11; Spontaneous response from citizens

पुणे : Pune PMC Elections |  पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ (रामबाग कॉलनी–शिवतीर्थ नगर) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार श्री. हर्षवर्धन दीपक मानकर, सौ. तृप्ती निलेश शिंदे आणि सौ. कांता नवनाथ खिलारे यांच्या कोपरा सभा केळेवाडी परिसरातील अमरज्योत मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ, दुर्गामाता प्रतिष्ठान, राजमुद्रा प्रतिष्ठान, हनुमाननगर येथील मिलिंद संघ तसेच जयभवानीनगर परिसरात पार पडल्या. या सभांना माजी उपमहापौर श्री. दीपक मानकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

संपूर्ण पॅनलने कोपरा सभांच्या माध्यमातून थेट नागरिकांशी संवाद साधला. या संवादाला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागरिकांच्या सोबत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.

यावेळी श्री. हर्षवर्धन दीपक मानकर यांनी प्रभागात केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. हनुमाननगर व केळेवाडी परिसरातील रस्त्यांची कामे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतेसाठी कचरा गाडीची सुविधा व स्वखर्चाने नियुक्त केलेले स्वच्छता कर्मचारी, शहरी गरीब योजनेअंतर्गत आरोग्य सुविधा, महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, नव्याने उभारण्यात येणारे प्रसूतिगृह तसेच मामासाहेब मोहोळ शाळेत राबवलेली विकासकामे यांचा त्यांनी आढावा घेतला. प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलमधील सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

माजी उपमहापौर श्री. दीपक मानकर म्हणाले, “हर्षवर्धन मानकर गेल्या आठ ते दहा वर्षांपासून पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन यांसह नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी सातत्याने काम करत आहेत. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी मामासाहेब मोहोळ शाळेत केलेल्या विकासकामांमुळे ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमात शाळेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. प्रभागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी हर्षवर्धन मानकर सर्वतोपरी मदत करत आहेत.”

दरम्यान, स्थानिक नागरिक सौ. संगीता बाळकृष्ण अहिरे यांनी आपला अनुभव सांगताना म्हटले की, काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलीला मेंदूच्या आजारासाठी आर्थिक मदतीची गरज होती. त्या वेळी श्री. दीपक मानकर यांनी रुग्णालयात दाखल करण्यापासून उपचारांचे बिल भरण्यापर्यंत सर्वतोपरी मदत केली. आज मुलीचे लग्न झाले असून तिचा संसार सुरळीत सुरू आहे. “हे सर्व दीपकभाऊंच्या मदतीमुळे शक्य झाले,” असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.

You may have missed