Pune PMC Elections | सशक्त महिला, सक्षम समाज; ऐश्वर्या पठारे यांची विकासदृष्टी

Pune PMC Elections | Empowered women, empowered society; Aishwarya Pathare's vision of development

पुणे: Pune PMC Elections | पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०३ (विमाननगर-लोहगाव) परिसरात कोपरा सभांना वेग आला आहे. भाजपा-आरपीआय महायुतीच्या उमेदवारांच्या लोहगाव येथील ग्रीन पार्क तसेच वाघोलीतील पुर्वरंग सोसायटी, फुलमला रोड येथे कोपरा सभांना शुक्रवारी (ता. ०९) नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

यावेळी भाजपा-आरपीआय महायुतीच्या उमेदवार ऐश्वर्या सुरेंद्र पठारे, डॉ. श्रेयस प्रितम खांदवे, अनिल दिलीप सातव व रामदास दत्तात्रय दाभाडे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत महिला सक्षमीकरण, सुरक्षितता, शिक्षण, आरोग्य व सामाजिक सहभाग या मुद्द्यांवर आपली स्पष्ट भूमिका मांडली. “महिला सक्षम झाल्या तरच समाज सक्षम होतो. महिलांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेतल्याशिवाय खरा विकास शक्य नाही,” असे मत यावेळी ऐश्वर्या पठारे यांनी व्यक्त केले.

सभेदरम्यान नागरिकांनी परिसरातील विविध प्रश्न, अपेक्षा व सूचना मांडल्या. या सर्व मुद्द्यांची दखल घेत विकास बोलून नाही, तर प्रत्यक्षात करून दाखवण्याचा आमचा संकल्प असल्याचे ऐश्वर्या पठारे यांनी सांगितले. महिलांच्या आरोग्यविषयक सुविधा, सुरक्षित सार्वजनिक जागा, शिक्षणाच्या संधी आणि रोजगाराभिमुख उपक्रम यावर विशेष भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

येणाऱ्या काळात प्रभागाचा सर्वांगीण, नागरिककेंद्रित विकास साधण्यासाठी आम्ही चौघेही एकत्रितपणे कार्यरत राहू, असा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला.

नागरिकांनी दाखवलेला सकारात्मक प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक ०३ मध्ये विकासकेंद्रित व लोककेंद्रित नेतृत्वाला बळ मिळणार असल्याचे संकेत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी हा विश्वास व पाठिंबा आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

You may have missed