Pune PMC Elections | प्रभाग क्रमांक 13 : विकारअहमद मुख्तार शेख यांना मत म्हणजे अजितदादा यांना मत; वारं फिरलंय…. घड्याळ ठरवलंय..
पुणे : Pune PMC Elections | पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ पुणे स्टेशन – जयजवाननगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत येथील उमेदवार विकारअहमद मुख्तार शेख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. विकारअहमद मुख्तार शेख हे प्रभागाच्या विकासासाठी सक्षम व विश्वासार्ह उमेदवार आहेत. त्यांना दिलेले प्रत्येक मत म्हणजे अजितदादा यांना दिले मत आहे, असा ठाम संदेश यावेळी सभेतून देण्यात आला. त्यामुळे आता विकारअहमद मुख्तार शेख यांना मत म्हणजे अजितदादा यांना थेट मत असे मतदारांनी मानले आहे.
या जाहीर सभेनंतर विकारअहमद मुख्तार शेख यांच्या प्रभागामध्ये होत असलेल्या पदयात्रांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. विकारअहमद मुख्तार शेख यांनी रॉयल कॅनॉट बोट क्लब परिसर, बंडगार्डन परिसर, हजरत शाहदलवाल बाबा दर्गा परिसरात पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. प्रभागातील सर्व भागातून विकारअहमद शेख यांना वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे.
