Pune PMC Elections | पुणे : प्रभाग क्रमांक 11 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचाराचा धडाका; हर्षवर्धन दीपकभाऊ मानकर, तृप्ती निलेश शिंदे आणि कांता नवनाथ खिलारे यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : Pune PMC Elections | महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल प्रभाग क्रमांक 11 मधील विविध सोसायटी परिसरात प्रचारासाठी नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर, तृप्ती निलेश शिंदे आणि कांता नवनाथ खिलारे यांनी रामबाग कॉलनी, माजी सैनिक वसाहत, सिग्मा वन, स्वयंसिद्धा सोसायटी, ऋतुजा सोसायटी आदी भागांना भेटी दिल्या.
या भेटीदरम्यान सोसायटीतील दैनंदिन नागरी समस्या, पायाभूत सुविधांची स्थिती, परिसरातील वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच सुरक्षिततेसंदर्भातील मुद्द्यांवर नागरिकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. याच वेळी परिसराच्या नियोजित आणि सर्वांगीण विकासासाठी आपली दिशा, प्राधान्यक्रम आणि कार्यपद्धती उमेदवारांनी नागरिकांसमोर मांडली.
आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. सोसायटीतील नागरिकांनी केवळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवणारी आणि सातत्याने संपर्कात राहणारी भूमिका अधिक सकारात्मक असल्याची भावना व्यक्त केली.
नागरिकांच्या सहकार्याने सोसायटी भागासह संपूर्ण प्रभागाचा समतोल, सुरक्षित आणि शाश्वत विकास साधण्यासाठी पुढील काळात अधिक प्रभावी, पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने काम करत राहण्याचा ठाम निर्धार हर्षवर्धन मानकर यांनी व्यक्त केला.
तसेच प्रभागातील किश्किन्धा नगर, राऊतवाडी आणि केळेवाडी या वस्ती भागांमध्ये कोपरा सभा घेण्यात आल्या. या सभांना बाल तरुण मित्र मंडळ, बाल शिवाजी मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ, अचानक मित्र मंडळ, लहुजी मित्र मंडळ, छोटा जवान मित्र मंडळ आणि म्हाळसाकांत सेवा ट्रस्ट आदी विविध गणेश मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
