Pune PMC Elections | भाजप उमेदवार गणेश बिडकर यांना प्रभाग क्रमांक 24 मध्ये दक्षिण भारतीय समाजाचा उत्स्फूर्त पाठिंबा

Pune PMC Elections | BJP candidate Ganesh Bidkar receives overwhelming support from South Indian community in Ward No. 24

पुणे : Pune PMC Elections | पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मधील भाजप उमेदवार गणेश बिडकर यांनी आज सकाळी श्री अय्यप्पा मंदिरात दर्शन घेतले. या मंदिरांचे केरळमधील साउथ इंडियन समाजासाठी विशेष धार्मिक महत्त्व आहे. आणि हे शहरातील सर्वात जुन्या दाक्षिणात्य मंदिरांपैकी एक मानले जाते.

दर्शनावेळी रस्ता पेठ परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्य करणाऱ्या दक्षिण भारतीय समाजातील नागरिकांनी गणेश बिडकर यांचे स्वागत केले आणि त्यांना पाठिंबा दर्शविला. बिडकर यांनी मंदिरात आरती करून दर्शन घेतले आणि उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी उपस्थित दक्षिण भारतीय नागरिकांनी सांगितले की, “गणेश बिडकर हे आमच्या घरातील कुटुंबीयांसारखे आहेत. कुटुंबातील कोणतेही काम असेल तर त्यांना सांगितल्यानंतर ते तातडीने पूर्ण करतात.

मिसेस बिडकर यांनाही कोणतेही काम सांगितले की त्या बहिणीसारख्या धावून येतात आणि काम पूर्ण करतात. म्हणूनच आम्ही त्यांना आमच्या कुटुंबातील एक सदस्य मानतो आणि त्यांना पूर्ण पाठिंबा देतो.”

यावेळी मंदिर समितीचे उपाध्यक्ष महेश पोडवाल म्हणाले, “या प्रभागातील श्री अय्यप्पा मंदिरासाठी किंवा समाजासाठी आम्ही कधीही काही मागणी केली तर गणेश बिडकर यांनी ती नेहमी तातडीने पूर्ण केली आहे. भविष्यातही आमच्या अपेक्षा आहेत आणि ते त्या पूर्ण करतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे संपूर्ण प्रभागातील दक्षिण भारतीय समाज त्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे.”

सचिव शशांक नायर यांनी सांगितले की, आरोग्याच्या समस्या असोत वा इतर कोणतीही अडचण, अगदी अर्ध्या रात्रीही गणेश बिडकर यांना हाक देऊन मदतीसाठी बोलावले तर ते त्वरित धावून येतात. “अशा समर्पित आणि जनसेवक माणसासाठी आमचा समाज कायमच मदतीस धावून जाईल आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल,” असे ते म्हणाले.

दक्षिण भारतीय समाजाचा पाठिंबा प्रभाग २४ मधील निवडणूक प्रचारात गणेश बिडकर यांना मोठी ताकद देणारा ठरला आहे.

You may have missed