Pune PMC Elections | पुण्यातील पर्यावरण संरक्षणासाठी ठोस कृती आराखडा करणार ! भाजप-आरपीआय (आठवले गट) मित्रपक्षांच्या प्रभाग 12 (ड) छत्रपती शिवाजीनगर – मॉडेल कॉलनीच्या उमेदवार प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे यांचा निर्धार

Pune PMC Elections | A concrete action plan will be made for environmental protection in Pune! BJP-RPI (Athawale Group) alliance candidate for Ward 12 (D) Chhatrapati Shivajinagar - Model Colony Principal Dr. Nivedita Ekbote's determination

पुणे : Pune PMC Elections | पुणे शहरातील वाढत्या पर्यावरणीय समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत, शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. पुण्यातील नैसर्गिक इकोसिस्टीम जपणे, जैवविविधतेचे संरक्षण करणे तसेच प्रदूषित नद्यांचे पुनरुज्जीवन करणे या प्रमुख उद्दिष्टांसह पर्यावरण विषयक कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.

शहरातील नद्या, ओढे व जलस्रोत मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले असून, त्यावर उपाययोजना करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. नदी स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन , प्लास्टिक वापर कमी करणे, हरित क्षेत्र वाढवणे आणि नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करणे यावर भर दिला जाणार आहे.

विशेषतः प्रभाग क्रमांक १२ मधील पर्यावरण समस्या लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांच्या सहभागातून उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. हवेचे प्रदूषण, कचरा व्यवस्थापन, पाण्याचे प्रदूषण आणि वृक्षतोड यांसारख्या समस्यांवर ठोस तोडगा काढण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला जाईल. सौर ऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणे आवश्यक आहे. पुणे शहरातील कार्बन उत्सर्जनात गेल्या काही वर्षात दुपटीने वाढ झाली आहे. ही वाढ शहराच्या पर्यावरणासाठी गंभीर इशारा ठरत आहे. पुणे महापालिकेच्या २०२४-२५ पर्यावरण सद्य:स्थिती अहवालात ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या समितीच्या माध्यमातून यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.


पुणे शहर हे सांस्कृतिक व शैक्षणिक वारसा लाभलेले शहर असून, त्याचे पर्यावरणीय संतुलन राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. प्रभाग क्रमांक १२ सोबत संपूर्ण पुण्यातील पर्यावरण समस्या सोडविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले जाणार असून, ‘हरित, स्वच्छ आणि शाश्वत पुणे’ हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून काम करण्यात येणार आहे.पुण्यातील डोंगर आणि टेकड्या यांच्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाची गरज आहे.पुण्यातील पर्यावरणप्रेमी संस्थांच्या माध्यमातून याला प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न राहील. सौर ऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणे फार आवश्यक आहे याबाबत जनजागृती केली जाईल.

वडारवाडी परिसरातील नागरिकांशी आज त्यांनी पदयात्रेच्या माध्यमातून संवाद साधून तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी मॉडेल कॉलनी सुधारणा समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला .आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. डेक्कन जिमखाना ,प्रभात रोड,भांडारकर रोड वरील सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या पद्यात्रेनंतर झालेल्या सभेमध्ये भाजप – आरपीआय ( आठवले गट ) मित्रपक्षांच्या प्रभाग १२ (ड) छत्रपती शिवाजीनगर – मॉडेल कॉलनीच्या उमेदवार डॉ.निवेदिता एकबोटे यांनी तेथील जनतेशी सुसंवाद साधला. वडारवाडी प्रभागातील नागरिकांना अधिक प्रभावी, पारदर्शक व वेळेत सेवा मिळाव्यात या दृष्टीकोनातून वडारवाडी प्रभागात ‘स्मार्ट मॉडेल’ उभे केले जाणार आहे. नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित सेवा एका छताखाली, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. नागरिकांना सहज, सुलभ आणि वेळेत सेवा मिळावी, हाच या स्मार्ट मॉडेलचा मुख्य उद्देश असून, वडारवाडी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी हे मॉडेल मार्गदर्शक ठरेल.

या स्मार्ट मॉडेलच्या माध्यमातून पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, रस्ते, सार्वजनिक आरोग्य, स्ट्रीट लाईट, तक्रार निवारण यांसारख्या मूलभूत सेवांचे नियोजन अधिक कार्यक्षम पद्धतीने करण्यात येईल. नागरिकांच्या समस्या त्वरित नोंदवून त्यावर जलद उपाययोजना करण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

स्थानिक नागरिकांचा सहभाग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रशासकीय यंत्रणेशी समन्वय साधत वडारवाडी भागाला सेवा-सुविधांच्या दृष्टीने एक आदर्श ‘स्मार्ट भाग’ म्हणून विकसित करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.

वडारवाडी ३९१ येथून आज पदयात्रेस सुरवात झाली. या पदयात्रेचे नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. हि पदयात्रा पुढे शिरोळे पार्क , संगन्ना मित्र मंडळ , राजू मित्र मंडळ ,वडार समाज श्री मारुती मित्र मंडळ , डॉ. होमिभाभा हॉस्पिटल या परिसरातून पुढे मार्गक्रमण करत आनंद यशोदा सोसायटीच्या परिसरात गेली. या परीसरातील नागरिकांशी आज त्यांनी पदयात्रेच्या माध्यमातून संवाद साधून तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन असे आश्वासन दिले

प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे यांच्यासह पक्षाचे उमेदवार सौ.अमृता म्हेत्रे (झडपे) श्री. अपूर्व खाडे, सौ. पूजा जागडे हेही प्रभागातील नागरिकांच्या भेटी वेळी उपस्थित होते.या पदयात्रेत माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे, डॉ. श्री. नंदकिशोर एकबोटे , पंकज उणेचा , संतोष जगताप, शंकर भंडारी, राजू ओरसे, जितेंद्र राऊत ,कुणाल बहिरट , सिद्धी वाघोलीकर ,आशा धोत्रे , आयेशा कुरेशी , सीमा उत्तेकर , सोनी पवार राम म्हेत्रे, यांच्यासह मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

You may have missed