Pune PMC Elections | अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रभाग 9 चा विकास प्रगती अहवाल व ‘जनहितनामा’ प्रकाशित

Pune PMC Elections | Ward 9 Development Progress Report and ‘Janahitnama’ Released by Ajit Pawar

पुणे : Pune PMC Elections | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रभाग ९ मधील विकासकामांचा सविस्तर प्रगती अहवाल जिजाऊ बंगला, पुणे येथे प्रकाशित करण्यात आला.

यावेळी प्रभागातील नागरिकांच्या अपेक्षा, समस्या व सूचनांचा समावेश असलेला ‘जनहितनामा’ देखील प्रसारित करण्यात आला. येणाऱ्या काळात प्रभागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा जनहितनामा तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण तसेच अमोल बालवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रगती अहवालात आतापर्यंत राबविण्यात आलेली विकासकामे, विविध जनकल्याणकारी उपक्रम तसेच भविष्यातील नियोजनबद्ध विकासाचा ठोस आराखडा सविस्तरपणे मांडण्यात आला आहे. विकासासाठी दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ठाम संकल्प यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

You may have missed