Pune PMC Elections | प्रभाग क्रमांक 03 मध्ये भाजपा-आरपीआय महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार दौरा जोमात
पुणे : Pune PMC Elections | पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०३ मध्ये भाजपा-आरपीआय महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार दौरा जोरदार सुरू असल्याचे दिसून येते. विमाननगर येथील कोणार्क कॅम्पस, रोहन मिथिला सोसायटी, लुंकड गोल्ड कॉस्ट तसेच वाघोली येथील कमल बाग, जेड रेसिडेन्सी फेज १ व २, मॅजेस्टिक सिटी, रेन्बो ग्रेस, डायमंड क्रिस्ट, रेवा सोसायटी व इतर विविध सोसायट्यांमधील नागरिकांशी थेट संवाद यावेळी साधण्यात आला.
यावेळी उमेदवारांनी परिसरातील पाणीपुरवठा, वाहतूक, पार्किंग, स्वच्छता, सुरक्षा, हरित क्षेत्रे व नागरी सुविधा या विषयांवर विकासाची स्पष्ट भूमिका मांडली. तसेच, नागरिकांच्या अपेक्षा, सूचना जाणून घेतल्या.
अ गटाचे उमेदवार श्रेयस खांदवे यांनी सांगितले, “आरोग्य, वाहतूक आणि मूलभूत सुविधा या मुद्द्यांवर ठोस तसेच वेळबद्ध काम करणे ही आमची प्राथमिकता आहे.”
ब गटाचे उमेदवार अनिल सातव म्हणाले, “नागरिकांच्या रोजच्या अडचणी समजून घेऊन त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे हेच आमचे ध्येय आहे.”
क गटाच्या उमेदवार ऐश्वर्या पठारे म्हणाल्या, “विकास हा लोकांशी संवादातून घडतो. प्रभाग ३ चा विकास आधुनिक, सुरक्षित आणि नियोजनबद्ध असायलाच हवा.”
ड गटाचे उमेदवार रामदास दाभाडे यांनी विश्वास व्यक्त केला की, “लोकसहभागातूनच खरा विकास घडतो आणि तोच आमच्या कामाचा पाया असेल.”
या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून प्रभाग क्रमांक ०३ मध्ये विकासकेंद्रित व लोकाभिमुख नेतृत्वाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
