Pune PMC Elections | एकत्रित नेतृत्वातूनच सक्षम प्रभाग घडतो; प्रभाग 04 मधील भाजपा-आरपीआय महायुतीची भूमिका
पुणे: Pune PMC Elections | “प्रभाग क्रमांक ०४ चा विकास हा व्यक्तीगत नव्हे तर संघभावनेतून, एकत्रित नेतृत्वातून आणि नागरिकांच्या सहभागातूनच घडवला जाणार आहे,” अशी ठाम भूमिका भाजपा-आरपीआय महायुतीचे उमेदवार शैलजीत बनसोडे, रत्नमाला सातव, सुरेंद्र पठारे व तृप्ती भरणे यांनी व्यक्त केली.
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०४ मध्ये महायुतीच्या उमेदवारांनी मॅपल वूड सोसायटी, ड्रीम संकल्प १ व २, श्रीराम पॅराडाइज, निओ सिटी फेज १ व २, न्याती सेंट्रल १ व २, ऑक्सी डिझायर, गेरा ग्रीनविले, शिवा पॅलेस व साईनाथ नगर व्यापारी मंडळ अशा विविध ठिकाणी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. प्रत्येक ठिकाणी नागरिकांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा ऐकून घेत विकासाचे मुद्दे मांडण्यात आले.
यावेळी शैलजीत बनसोडे म्हणाले, “प्रभागाचा विकास हा सर्वसमावेशक असला पाहिजे. प्रत्येक भागाला समान सुविधा मिळाल्या पाहिजेत.” रत्नमाला सातव म्हणाल्या, “महिलांची सुरक्षितता, स्वच्छ परिसर आणि कुटुंबांसाठी सोयी सुविधा हा विकासाचा पाया असतो.” सुरेंद्र पठारे यांनी सांगितले, “शिक्षित आणि प्रामाणिक नेतृत्वातूनच नागरिकांचा विश्वास जिंकता येतो आणि तोच खरा विकासाचा मार्ग आहे.” तृप्ती भरणे म्हणाल्या, “वाढत्या लोकसंख्येला सामोरे जाणारा नियोजनबद्ध आणि हरित विकास हवा आहे.”
प्रभागाच्या विकासयात्रेला बळ देण्यासाठी १५ जानेवारी रोजी निवडणुकीत कमळ चिन्हासमोरील बटण दाबून आम्हा सर्व उमेदवारांना मतदान करून आपला विश्वास व्यक्त करावा, असे आवाहन यावेळी उमदेवारांकडून करण्यात आले.
