Pune PMC Elections | प्रभाग क्रमांक 23 रविवार पेठ – नाना पेठ : आधुनिक विचार, संवेदनशील नेतृत्व, सामान्यांचा आवाज – शहाबाज खान
पुणे : Pune PMC Elections | प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ – नाना पेठमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आधुनिक विचाराचे, संवेदनशील मनाचे नेतृत्व आणि सामान्यांचा आवाज असलेले शहाबाज खान यांना उमेदवारी दिली आहे.
आपल्या उमेदवारीविषयी शहाबाज खान म्हणाले की, महाराष्ट्राचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माझ्यावर विश्वास ठेवून त्यांच्या विकास कामात मला सहभागी करुन घेतले आहे. याचा मला खूप आनंद झाला आहे. आपल्या प्रभागाच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय ठेवून मी निवडणुकीला सामोरे जात असून मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
मला घरातूनच समाजकार्याचा वसा मिळाला आहे. माझी आई नगरसेविका जिल्लेहुमा खान, मामा रशिदभाई शेख आणि रफिक शेख यांच्या कामामुळे माझाही संपूर्ण प्रभागात मतदारांशी संपर्क राहिला आहे. प्रभागातील नागरिक हे आश्वासन देणार्यांवर नव्हे तर प्रत्यक्ष काम करणार्यांवरच विश्वास ठेवतात. त्यामुळे या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलेल्या कामांमुळे आम्हा चारही उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे शहाबाज खान यांनी सांगितले.
मतदारांच्या आता नगरसेवकाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्याबरोबर युवक युवतींना तो आधुनिक विचार मानणारा, उच्च विचारांचे नेतृत्व करणारा, त्याचवेळी संवेदनशील मनाचा नगरसेवक असावा, अशी अपेक्षा असते. सर्वांना बरोबर घेऊन चालणारा असावा, त्याचवेळी तो सामान्यांचा आवाज बनून महापालिकेत काम करणारा असावा, अशी अपेक्षा आहे. मतदारांच्या या अपेक्षेला उतरण्याचा माझा पूरेपूर प्रयत्न असणार आहे, माझ्या या विचारामुळेच मला सर्व प्रभागातून वाढता पाठिंबा मिळत आहे.
