Pune PMC Elections | प्रभाग क्रमांक 09 : ‘सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना मतदानातून धडा शिकण्याची वेळ’ – प्रमोद अण्णा निम्हण यांचे मतदारांना आवाहन
पुणे : Pune PMC Elections | राजकीय स्वार्थ आणि बेकायदा कृत्यांसाठी सत्तेचा गैरवापर करून मुजोरी करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी पाषाण, बाणेर, सूस, म्हाळुंगे गावातील जनता सज्ज झाली असून प्रमोद अण्णा निम्हण आणि पूनम ताई विधाते यांना निवडून देऊ, अशा शब्दांत पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ९ मधील विजयी संकल्प मेळाव्यात निर्धार व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाकडून प्रमोद अण्णा निम्हण यांना आयत्या वेळेला डावलून बाबूराव चांदेरे यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयाला पहिल्या दिवसापासून नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. तसेच, बाहेरील पक्षातून उमेदवार असतात करून निष्ठावंतांवर अन्याय केल्याच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. उत्स्फूर्तपणे गाव बंद ठेवून नागरिकांनी आपला विरोध जाहीर केला होता. आता शिट्टी या चिन्हावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेले प्रमोद अण्णा निम्हण आणि निवडणूक लढवत असलेल्या पूनमताई विधाते यांना निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे.
या निर्धार जनसभेला उमेदवार प्रमोद अण्णा आणि पूनम ताई यांच्यासह नेश्वर पारखे, भगवान निम्हण, प्रतिभा जाधव, शशिकांत निम्हण, शैलेश निम्हण, सुहास सोनवणे आदींनी संबोधित केले.
विरोधकांना पराभव दिसू लागला असल्याने ते अपप्रचार करीत आहेत.
अपक्षांना मतदान देऊ नका, असा अपप्रचार सोसायटी भागात केला जात आहे. त्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. वास्तविक, सर्व सोसायट्या फक्त आपल्या पाठीशी आहेत. म्हणूनच हा अपप्रचार मोडून काढला पाहिजे, असे आवाहन करण्यात आले.
आत्तापर्यंत फक्त जागांचे आरक्षण उठवायचे आणि जागा बळकवायच्या हेच धोरण आत्तापर्यंत ज्यांनी ठेवलं त्यांनी प्रभागाचा काहीही विकास केला नाही, हे सर्वांनी पाहिलं आहे.त्यांना घरी बसविण्याची वेळ आली आहे, असेही सांगण्यात आले.
प्राचार्य यशवंत सोनवणे म्हणाले की , प्रभागातील सर्वसामान्य माणसाची अवस्था अत्यंत बिकट आहे. यावर आवाज उठवण्यासाठी प्रमोद अण्णांना आणि पूनम ताईंना पालिकेत पाठवणे हे आपले कर्तव्य आहे.
आपल्या प्रभागाचा विकास योग्य पद्धतीने करण्यासाठी आम्हाला निवडून द्या. असे आवाहन प्रमोद अण्णा निम्हण यांनी या सभेत केले.
