Pune PMC Elections | मुळशीकरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना भक्कम साथ; मुळशीकर मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न
पुणे : Pune PMC Elections | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भोर-राजगड- मुळशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री. शंकर मांडेकर आणि माजी उपमहापौर श्री. दीपक मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदणी लॉन्स,चांदणी चौक येथे भव्य मुळशीकर स्नेह मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अत्यंत उत्साहात पार पडला.
या स्नेह मेळाव्यात प्रभाग क्रमांक १० मधील उमेदवार अभिजीत राजेंद्र दगडे, जयश्री गजानन मारणे, सुजाता सूर्यकांत मुंडे, शंकर दत्तात्रय केमसे तसेच प्रभाग क्रमांक ११ मधील उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर, तृप्ती निलेश शिंदे, कांता नवनाथ खिलारे, प्रभाग क्रमांक मधील उमेदवार कु. शुभम माताळे, प्रभाग क्रमांक ३१ मधील उमेदवार श्री. संतोष मोहोळ, श्री. राज जाधव यांच्या प्रचारार्थ नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासाभिमुख धोरणांवर प्रकाश टाकत उमेदवारांना भरघोस पाठिंबा देण्याचे आवाहन केले. सर्वांगीण विकासासाठी एकसंघपणे काम करण्याचा निर्धार यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून मुळशी तालुक्यातील नागरिकांशी भावनिक नाते अधिक दृढ झाले. गाव, माती आणि माणसांशी असलेली आपुलकी जपत, पुणे शहरात राहणाऱ्या मुळशीकरांच्या समस्या, अपेक्षा व विकासाबाबत संवाद साधण्यात आला. याच कार्यक्रमातून पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १०, ११, २९ आणि ३१ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, दोन्ही प्रभागातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि नागरिकाभिमुख प्रशासनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
एकजुटीच्या बळावर पुणे शहराच्या विकासात मुळशीकरांचा सक्रिय सहभाग अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. माजी उपमहापौर श्री. दीपक मानकर यांनी पसायदान म्हणून मेळाव्याचा समारोप केला. हा भव्य स्नेहमेळावा मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती श्री. बाबा कंधारे, शांताराम इंगवले, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री. अंकुश मोरे, श्री. निलेश शिंदे यांच्या सुयोग्य नियोजनातून यशस्वीरीत्या संपन्न झाला.
यावेळी पी.डी.सी.सी. बँकेचे व्हाईस चेअरमन श्री. सुनील चांदेरे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. माजी महिला अध्यक्ष सौ. सविताताई दगडे यांच्यासह मुळशीकर नागरिक, प्रभाग क्र. १०, ११,२९,३१ मधील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
