Pune Crime News | पिस्टल दाखवून धमकाविणार्या रेकॉर्डवरील तिघांना नर्हे पोलिसांनी पकडून पिस्टल केले जप्त
पुणे : Pune Crime News | पिस्टल दाखवून एकाला धमकाविल्याची मिळालेल्या माहितीवरुन नर्हे पोलिसांनी तिघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून एक पिस्टल जप्त केले आहे.
यश विनय शहा Yash Vinay Shah (वय २५, रा. नवले इंडस्ट्रीज, नर्हे), यश विठ्ठल कट्टीमणी Yash Vitthal Kattimani (वय २४, रा. जाधव बिल्डिंग, गोकुळनगर, धायरी), यश मनोहर पोळ Yash Manohar Pol (वय २४,रा. आंगण, नर्हे रोड, गोकुळनगर, धायरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस मार्शल शोभासिंग शिवाजी भालेराव यांनी नर्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार गोकुळनगर येथील पार्किंगच्या मोकळ्या मैदानात ११ जानेवारी रोजी पहाटे पावणे पाच वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश शहा, यश कट्टीमणी आणि यश पोळ यांच्यावर मारामारीचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. पोलीस पहाटे गस्त घालत असताना या तिघांनी एकाला पिस्टल दाखवून धमकावले. त्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गोकुळनगर पार्किंगच्या मोकळ्या मैदानाचे समोरील रोडवर थांबलेल्या तिघांना पकडले. त्यांच्याकडून एक लोखंडी पिस्टल पोलिसांनी जप्त केले आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे तपास करीत आहेत.
