Pune Crime News | औषध वितरकांची फसवणुक करणार्‍या सोनाली लक्ष्मण गिरीगोसावी, जयेश वसंत जैन यांच्याविरुद्ध चौथा गुन्हा दाखल; आतापर्यंत 18 कोटींचे गुन्हे दाखल

Pune Crime News | Fourth case registered against Sonali Laxman Girigosavi, Jayesh Vasant Jain for cheating drug distributors; Cases worth Rs 18 crore registered so far

पुणे : Pune Crime News | सदाशिव पेठेतील एका औषध वितरकाची ३ कोटी ५४ लाख रुपयांची फसवणुक करण्यात आल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनाली लक्ष्मण गिरीगोसावी Sonali Laxman Girigosavi (वय ४२, रा. अर्चना कोहिनूर ग्लोरी, महंमदवाडी, हडपसर), जयेश वसंत जैन Jayesh Vasant Jain (वय ४१, रा. भक्ती पुजा अपार्टमेंट, गुलटेकडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात हा चौथा गुन्हा दाखल झाला आहे. त्या दोघांनी मिळून सदाशिव पेठेतील औषध वितरकांना २०२४ पासून आतापर्यंत तब्बल १८ कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचा गंडा घातला आहे. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. असे असतानाही ते अजूनही उजळ माथ्याने फिरत आहे.

याबाबत दिनेश सुभाष कर्नावट (वय ५१, रा. ठुबे पार्क, शिवाजीनगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान सदाशिव पेठेतील गाडगीळ रस्त्यावरील सिनिअर एजन्सीमध्ये घडला आहे.

सोनाली गिरीगोसावी यांनी इतरांना ज्या पद्धतीने फसवले, त्याचप्रमाणे सुरुवातीला पैसे देऊन औषधांची खरेदी केली. त्यांचा विश्वास संपादन केल्यावर जयेश जैन याला क्रेडिट वर माल द्यावा, पैसे मी देईन, असे सांगून आश्वसत केले. त्यांनी ३ कोटी ५४ लाख ५५ हजार ३२९ रुपयांची औषध खरेदी करुन पैसे न देता फसवणूक केली.सहायक पोलीस निरीक्षक जानराव तपास करीत आहेत.

गेल्या ६ ते ८ महिन्यांपासून सोनाली गिरीगोसावी व जयेश जैन यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यांचा अटकपूर्व जामीनही न्यायालयाने फेटाळला आहे. परंतु, पोलिसांनी अजूनही कोणतीही कारवाई केली नसल्याचे सांगितले जात आहे.

You may have missed