Pune PMC Elections | प्रभाग 7 : गोखलेनगर-वाकडेवाडीमध्ये राष्ट्रवादीचे निलेश निकम, दत्ता बहिरट, अंजली ओरसे विजयी; माजी नगरसेविका रेश्मा भोसले, सायली माळवे, आशा साने पराभूत
पुणे : Pune PMC Elections | संपूर्ण पुण्यात भाजपची जोरदार घोडदौड सुरु असताना प्रभाग क्रमांक ७ गोखलेनगर – वाकडेवाडी प्रभागात भाजपला मागील वेळच्या तुलनेत ४ पैकी ३ जागा गमावण्याची नामुष्की आली आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश निकम, दत्ता बहिरट, अंजली ओरसे या विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या माजी नगरसेविका रेश्मा भोसले, आदित्य माळवे यांच्या पत्नी सायली माळवे आणि हरीश निकम यांचा पराभव केला. माजी नगरसेविका आशा साने त्यांचा पराभव झाला.
२०१७ मध्ये प्रभाग क्रमांक ७ मधून भाजपचे तीन आणि भाजपच्या पाठिंबा असलेल्या रेश्मा भोसले अशा चार जणांना विजय झाला होता. त्यावेळी रेश्मा भोसले यांच्या उमेदवारीवरुन वाद उच्च न्यायालयात गेला होता. त्यांना अपक्ष म्हणून निवडून लढवावी लागली होती. त्यांनी काँग्रेसचे दत्ता बहिरट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश निकम यांचा पराभव केला होता. यंदा रेश्मा भोसले यांना भाजपची अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेसचे दत्ता बहिरट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन उमेदवारी मिळविली. दत्ता बहिरट आणि रेश्मा भोसले अशी लढत झाली. त्यात ९१ पैकी ६५ मतदान केंद्रात भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर होते. शेवटच्या २ फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीनही उमेदवारांनी भाजपची आघाडी तोडून विजयी आघाडी घेतली.
दत्ता बहिरट यांनी ४० हजार २९० मतांपैकी १४ हजार ७२९ मते मिळवून मागील वेळच्या पराभवाचा बदला घेतला. निलेश निकम यांनी १४ हजार ४२० मते मिळवली तर अंजली ओरसे यांनी १४ हजार ३२७ मध्ये मिळवून विजय मिळविला. भाजपच्या निशा मानवतकर यांनी १४ हजार १२९ मते मिळवून विजय मिळविला.
