Pune Crime News | गँगस्टर गजा मारणेच्या टोळीतील गुंडाने महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन जमीन बळकाविली

Pune Crime News | Gangster from Gaja Marane gang snatches land after threatening to kill woman

पुणे : Pune Crime News | गँगस्टर गजा मारणे टोळीतील एका गुंडाने महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन तिची जमीन बळविल्याच्या प्रकार समोर आला आहे. सिंहगड पोलिसांनी या गुंडावर गुन्हा दाखल केला आहे.

वाघु तुकाराम हळंदे Waghu Tukaram Halande (रा. वारजे) व त्याचे साथीदार असे गुन्हा दाखल झालेल्या गुंडाचे नाव आहे.

याबाबत आंबेगाव पठार येथील एका ५३ वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सिंहगड कॉलेजच्या पाठीमागील बाजूच्या प्लॉटवर मे २०२४ पासून आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या मुळच्या बार्शी येथील श्रीपद पिंपरी येथील राहणार्‍या आहेत. त्यांचे पती दत्ता किसन पिंगळे यांनी सोपान गणपत काळे यांच्याकडून वडगाव बुद्रुक येथील ८५० चौ फुट जागा दस्ताने विकत घेतली. ती जागा त्यांच्या कुटुंबियाच्या मालकी हक्काची व ताबे वहिवाटीची होती. फिर्यादी यांच्या पतीचे निधन झाले आहे. गजानन मारणे चा माणूस वाघु हळंदे व त्याच्या साथीदाराने फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियाना जीवे ठार मारण्याची भिती दाखवून त्यांच्या जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मारुन जबरदस्तीने जागा बळकाविली आहे. त्यांच्या मालकीच्या जागेवर जाण्यास मज्जाव करुन त्यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने तपास करीत आहेत.

You may have missed