Pune Crime News | जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार करणार्या नराधमाने सोन्याचे दागिनेही नेले चोरुन
पुणे : Pune Crime News | जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार केले. तिचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने घेतले़ तिच्या पतीबरोबर झालेल्या भांडणाचा बदला म्हणून भावाला तिच्यावर जबरदस्तीने शरीरसंबंध करायला लावल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समर्थ पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे.
सुमेश शंकर गेंदे Sumesh Shankar Gende (वय ३०, रा. पुयणी, ता. पालम, जि. परभणी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. निलेश गेंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिलेने समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २६ सप्टेंबर ते ५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमेश गेंदे हा पुण्यात कामाला असताना हा प्रकार घडला आहे. त्याने फिर्यादी महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. तसेच तिला दमदाटी करुन तिचे कानातील सोन्याचे फुल व लहान मुलाच्या गळ्यातील चक्र काढून घेऊन त्याची विक्री केली. या महिलेच्या पतीशी झालेल्या भांडणाचा बदला म्हणून त्याचा भाऊ निलेश गेंदे याला तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध करावयास लावले. या अत्याचारामुळे शेवटी महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी सुमेश गेंदे याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक मगदुम तपास करीत आहेत.
