Pune Crime News | विजयानंतर विनापरवानगी मिरवणुक काढणार्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | महापालिका निवडणुकीनंतर परवानगी नसताना जनता वसाहत परिसरात मिरवणुक काढणार्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवकावर पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सुरज नथुराम लोखंडे Suraj Nathuram Lokhande (वय ४५, रा. दत्त मंदिर, जनता वसाहत, पर्वती) असे गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार काटकर यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २८ जनता वसाहत या प्रभागातून सुरज लोखंडे हे अवघ्या २२८ मतांनी निवडून आले. त्यांनी भाजपच्या विनया प्रसाद बाहुलीकर यांचा पराभव केला. मतमोजणीनंतर मिरवणुक काढण्यास बंदी होती. असे असताना सुरज लोखंडे यांनी मिरवणुक काढण्याची परवानगी मागितली. पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. तेव्हा त्यांनी पोलिसांना फक्त घरोघरी जाऊन भेटणार असल्याचे सांगितले. असे असािना जनता वसाहतीतील जय भवानीनगर येथे त्यांनी १०० ते १५० जणांना एकत्र करन मिरवणुक काढली. त्यानंतर पोलीस उपायुक्त विशेष शाखा यांच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
