Pune Crime News | चारित्र्याचा संशय घेऊन सासरी होणार्या छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; भारती विद्यापीठ पोलिसांनी चौघांना केली अटक
पुणे : Pune Crime News | चारित्र्याचा संशय घेऊन वारंवार मारहाण करुन सासरी होणार्या मानसिक व शारीरीक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीसह चौघांना अटक केली आहे.
ज्योती सागर शेडगे (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. सागर चंद्रकांत शेडगे Sagar Chandrakant Shedge (वय ३७), चंद्रकांत शेडगे (वय ६२), कमल चंद्रकांत शेडगे (वय ५७, सर्व रा. स्वामी कृपा बिल्डिंग, खेडकर चाळ, आंबेगाव पठार) आणि सारीका हर्षल वाल्हेकर Sarika Harshal Walhekar (वय ३३, रा. आंबेगाव बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना २० सप्टेंबर २०२० ते १५ जानेवारी २०२६ दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती हिचा सागर शेडगे याच्याबरोबर विवाह झाला. लग्न झाल्यापासून पती, सासुसासरे व नणंद यांनी ज्योती हिला लग्नात काही एक वस्तू दिल्या नाहीत, याचा राग मनात धरुन तिचा छळ सुरु केला. तुला स्वयंपाक करता येत नाही. तू गावंढळ आहे, असे टोमणे मारत. सागर शेडगे हा तिच्या चारित्र्याचा संशय घेऊन सर्व मिळून तिला वारंवार मारहाण करत. शिवीगाळ करुन तिचा मानसिक व शारीरीक छळ करत. या छळाला कंटाळून १५ जानेवारी रोजी ज्योती हिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम तपास करीत आहेत.
