Pune Crime News | दुसर्या मुलाबरोबरील प्रेमसंबंध घरी सांगू नये यासाठी तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन तिचे 101 ग्रॅमचे सोन्याचे दागिने घेणार्या तरुणाला पोलिसांनी केली अटक
पुणे : Pune Crime News | दुसर्या मुलाबरोबरील प्रेमसंबंध तिच्या घरी सांगू नये, यासाठी तरुणीला धमकावुन वेळोवेळी शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. तिच्याकडे पैशांची मागणी करुन १०१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन परत देण्यास नकार देणार्या तरुणाला फुरसुंगी पोलिसांनी अटक केली आहे.
नील भरत निंबाळकर Neel Bharat Nimbalkar (वय १९, रा. अष्टविनायक सोसायटी, फुरसुंगी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत एका १९ वर्षाच्या तरुणीने फुरसुंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार जुलै २०२५ ते १५ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या रिक्षामधून जात असताना तिला एका तरुणाबरोबर नील याने पाहिले. या कारणावरुन तुझ्या भावाला व दिदीला फोन करुन तू कोणाबरोबर फिरतेय हे सांगतो, तुझे त्याच्यासोबत अफेअर असल्याचे घरी सांगतो, अशी नील याने धमकी दिली. जर तुला तुझ्या घरच्यांना सांगायचे नसेल तर, असे म्हणून त्याने पैशांची मागणी केली.
फिर्यादीकडे पैसे नसल्याने त्याने वेळोवेळी तिला धमकावत तिच्याकडून १०१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेतले. त्यानंतर त्याने वेळोवेळी पैसे मागितले. फिर्यादीने नकार दिला असता तिच्याबरोबर शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. पोलिसांनी नील निंबाळकर याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक नलावडे तपास करीत आहेत.
