Raami Festival Pune | रमाई महोत्सवाच्या अध्यक्षपदी ॲड. प्रमोद आडकर तर कार्याध्यक्षपदी सचिन ईटकर

Raami Festival Pune | Adv. Pramod Adkar as the President of Raami Festival and Sachin Itkar as the Working President

पुणे : Raami Festival Pune | लोकसहभागातून साजऱ्या होणाऱ्या रमाई महोत्सवाच्या अध्यक्षपदी ॲड. प्रमोद आडकर यांची तर कार्याध्यक्षपदी सचिन ईटकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीच्या वतीने लोकसहभागातून साजरा होणारा रमाई महोत्सव एकमेव आहे. महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या १२९व्या जयंतीचे औचित्य साधून या वर्षी दि. २ ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सव महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, वाडिया कॉलेज समोर येथे होणार आहे. महोत्सवाच्या उद्‌घाटनासह रामजीबाबा आंबेडकर स्मृती पुरस्कार, रमाईरत्न पुरस्कार तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक विठ्ठल गायकवाड यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

You may have missed