Pune Crime News | मतमोजणीच्या दिवशी शिवीगाळ केल्यावरुन तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; पर्वती पोलिसांनी पाच जणांना केली अटक
पुणे : Pune Crime News | मतमोजणीच्या दिवशी शिवीगाळ केल्यावरुन तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पर्वती पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
या घटनेत मुकेश नामदेव पोटे (वय ४२, रा. जनता वसाहत, पर्वती) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. सुमित हरीदास पवार Sumit Haridas Pawar (वय ३२, रा. पर्वती), विजय प्रकाश हुलावले Vijay Prakash Hulawale (वय २९), भैय्या ऊर्फ आशुतोष सुभाष पवार Bhaiya alias Ashutosh Subhash Pawar (वय २५), निलेश रमेश पवार Nilesh Ramesh Pawar(वय ४०), किरण रमेश पवार Kiran Ramesh Pawar (वय ३३, सर्व रा. जनता वसाहत, पर्वती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना जनता वसाहतीतील वाघजाई माता मित्र मंडळासमोर १८ जानेवारी रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजता घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या मित्रांशी मतमोजणीच्या वेळी आरोपींबरोबर वाद होऊ एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली होती. १८ जानेवारी रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजता फिर्यादी व त्यांचे मित्र घरी जात होते. यावेळी तेथे थांबलेल्या आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. तेव्हा मुकेश पोटे यांनी त्यांना शिवीगाळ का करता, असे विचारले. त्यावर सुमित पवार व विजय हुलावळे यांनी तीक्ष्ण हत्याराने मुकेश पोटे यांच्यावर सपासप वार केले. तसेच इतरांनी फिर्यादींच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
पोलिसांनी १२ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून ५ जणांना अटक केली आहे़ पोलीस उपनिरीक्षक बी एम माळी तपास करीत आहेत.
