Raghavendra Bappu Mankar | दिलेला शब्द राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी 24 तासात पूर्ण केला; हिराबाग सोसायटीतील कचऱ्याची समस्या सोडविली
पुणे : Raghavendra Bappu Mankar | हिराबाग हाउसिंग सोसायटीतील एसआरए प्रकल्पात अस्वच्छतेमुळे निर्माण झालेली कचऱ्याची गंभीर समस्या नवनिर्वाचित नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी अवघ्या २४ तासांत सोडविली. निवडणुकीदरम्यान रहिवाशांनी ही समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. निवडणुकीनंतर प्राधान्याने उपाययोजना करण्याचे आश्वासन देत त्यांनी प्रत्यक्ष सोसायटीला भेट दिली.
इमारतीतील डक्टमध्ये कचरा साठू नये म्हणून प्रत्येक मजल्यावर जाळ्या लावण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. या कामासाठी इमारतीतील ९ मजल्यांवर ६०० हून अधिक जाळ्या बसविण्यात येणार आहेत. सर्वप्रथम डक्टची पूर्ण स्वच्छता करण्यात आली असून, रहिवाशांना डस्टबिनचे वाटप आणि ओला-सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती केली जाणार आहे.
रहिवाशांनी राघवेंद्र बाप्पु मानकर यांचे आभार मानत त्यांच्या तातडीच्या कारवाईचे कौतुक केले. या वेळी सोसायटीचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
