Pune Crime News | वजनकाट्यामध्ये कंडेन्सर बसवून छेडछाड करुन ट्रकचालकांनी 10 टन स्टिलबारचा अपहार करुन सिटी कॉर्पोरेशन कंपनीची केली फसवणूक
पुणे : Pune Crime News | आलेल्या मालाचे वजन करण्यासाठी व्हे ब्रीजच्या वजन काट्यावर कंडेन्सर (चीप) बसवून ट्रकचालकांनी १० टन स्टिलबारचा अपहार करुन सिटी कॉर्पोरेशनची साडेपाच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तिघा ट्रकचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सिटी कॉर्पोरेशन कंपनीचे उपसर व्यवस्थापक रेवणनाथ अजिनाथ राऊत (वय ४१, रा. काळेपडळ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी स्वप्नील पांडुरंग गर्जे Swapnil Pandurang Garje (वय ३०, रा. लिंबोडी, ता. आष्टी, जि. बीड), वाल्मिक सदाशिव बर्डे Valmik Sadashiv Barde (वय ३०, रा. नागेश वाडी, पाटोदा, बीड), विनोद सापन (रा. वरझडी, आष्टी, जि. बीड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १३ ते १७ जानेवारी दरम्यान अॅमेनोरा टाऊनशिप येथील व्हे ब्रीज येथे घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे उपसरव्यवस्थापक म्हणून अॅमेनोरा टाऊनशिपसाठी लागणारे साहित्याची आवक व व्यवहाराचे काम पाहतात. कंपनीने एसजेसीपी कंपनीकडे आर सी सी कॉन्ट्रक्ट दिलेले आहे त्याकरीता कंपनीने ३० लाख ६७ हजार ५५८ रुपयांचे ६० टन स्टिलबार मागविले होते. ईस्ट वेस्ट रोडलाईन्स ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मार्फत दोन ट्रकमधून हे स्टिलबार घेऊन वर्धा येथून पुण्यात १५ जानेवारी रोजी आले. अॅमेनोरा टाऊनशिप येथे व्हे ब्रीजजवळ आल्या. कंपनीचे वजन काट्यावर वजन करण्यासाठी या गाड्या पोहचल्या. पहिल्या गाडीचे वजन झाले. त्यानंतर दुसर्या गाडीचे वजन झाल्यानंतर गाडीवरील ड्रायव्हरने वजन काट्याचे खाली जाऊन त्याच्या मित्राने बसवलेली चिप (कंडेन्सर) काढत असताना तेथील कामगाराने पाहिले.
त्यावर ड्रायव्हरने त्यास कोणाला काही एक सांगू नकोस, असे सांगितले. ही घटना या कर्मचार्याने व्हे ब्रीजचा इन्चार्ज ऐजश पटेल यांना सांगितली. त्यांनी रेवणनाथ राऊत यांना सांगितले. आपले वजन काटा शॉर्ट येतोय, एका ड्रायव्हरनी आपल्या वजन काट्याचे खाली जाऊन काहीतरी छेडछाड केली आहेत. त्याने तेथून काहीतरी वस्तु काढली आहे. कंपनीच्या लोकांनी वाल्मिक बर्डे याला पकडले. त्याने दुसर्या चालकाचे नाव स्वप्नील गर्जे असल्याचे सांगितले. या गाड्याचे वजनकाट्यावर वजन केले असता़ त्यामध्ये ५ लाख ६५ हजार८९२ रुपयांचे १० टन स्टिलचा माल कमी मिळाला. चालकांनी वजनकाट्यावर कंडेन्सर लावून १० टन मालाचा अपहार करुन त्याची परस्पर विल्हेवाट लावली. सहायक पोलीस निरीक्षक साने तपास करीत आहेत.
