Pune PMC News | पुणे : महापालिका अधिकारी व प्रभाग क्रमांक 03 च्या नवनिर्वाचित नगसेवकांच्या समवेत लोहगावमध्ये पाहणी दौरा!
पुणे : Pune PMC News | लोहगाव व परिसराची महापालिका अधिकारी तसेच नवनिर्वाचित नगसेवकांच्या सोबत पाहणी दौरा केला. योजनानगर येथील ड्रेनेज पावसाळी लाईनची कामे सुरू करणे, जगद्गुरु कॉलनी येथील उर्वरित गणेश कामे व पावसाळी लाईनची काम करणे, ग्रीन पार्क , ड्रीम्स सोसायटी, ज्युपिटर कॉलनी, डिफेन्स कॉलनी, जेके पार्क, ब्लू स्काय, गोकुळ पार्क, गणेश पार्क, फॉर्च्यून सिटी येथील ड्रेनेज लाईन लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सर्वे पूर्ण करणे, व्हॉली व्होक सोसायटी लोहगाव येथील सांडपाण्याचा प्रश्न तसेच पाणीपुरवठाबाबत कामे पूर्ण करून उर्वरित पाण्याच्या टाक्यांची कामे तातडी पूर्ण करणे, लोहगाव शिंदे रस्ता व वाघोली रोडवरील स्मशानभूमीची पाहणी करून सदर कामे पूर्ण करणे अशा विविध कामांची पाहणी करून त्यावर लवकरात लवकर उपाययोजना तसेच विकासकामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
याप्रसंगी प्रभाग क्रमांक ०३ (विमाननगर-लोहगाव) मधील नवनिर्वाचित नगरसेवक सौ. ऐश्वर्या पठारे, श्री. रामदास दाभाडे, श्री. अनिल सातव, डॉ. श्रेयस खांदवे यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी व प्रभागाचा विकास करण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
मलनिस्सारण विभागाचे मुख्य अभियंता जगदीश खानोरे, कार्यकारी अभियंता विशाल हरिभक्त, युवराज हांडे, कनिष्ठ अभियंता सिद्राम पाटील, पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता शुभम घाटकर, पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता सुनील पोपळे, विभागीय आरोग्य निरीक्षक धनश्री जगदाळे, आरोग्य निरीक्षक गोपाळ नायडू, प्रीतम खांदवे, राजेंद्र खांदवे, दासआप्पा खांदवे तसेच नागरिक बांधव हेही यावेळी उपस्थित होते.
