Pune Crime News | सराईत गुन्हेगाराकडून पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त
पुणे : Pune Crime News | देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणार्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने वारजे माळवाडी भागातून अटक केली.
सागर गणेश सुतार Sagar Ganesh Sutar (वय २५, रा. दुगार्देवी मंदिराजवळ, गणपती माथा, वारजे माळवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सुतार याच्याविरुद्ध वारजे माळवाडी, सिंहगड रोड, हवेली, उत्तमनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, चोरी, दंगल माजविणे, आर्म अॅक्ट असे गंभीर स्वरुपाचे ८ गुन्हे दाखल आहेत.
खंडणी विरोधी पथक वारजे भागात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस हवालदार अमोल आव्हाड व पोलीस अंमलदार मयुर भोकरे यांना माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार सुतार हा शिवणे परिसरात थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे. या माहितीनुसार, पोलीस पथकाने शिवणे येथे थांबलेल्या सागर सुतार याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ४० हजार रुपयांचे गावठी पिस्टल व ४ जिवंत काडतुसे आढळून आली. सागर सुतार हा सराईत गुन्हेगार असून वारजे व उत्तमनगर पोलीस ठाण्याकडील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळगावे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, पोलीस हवालदार सयाजी चव्हाण, पोलीस अंमलदार बालारफी शेख, दुर्योधन गुरुव, नितीन कांबळे, मयुर भोकरे यांनी केली आहे.
