Pune Crime News | डेटिंग अॅपवरील ओळखीतून चौघांनी तरुणाला एकांत ठिकाणी नेऊन जीवे मारण्याची धमकी देऊन लुबाडले
पुणे : Pune Crime News | डेटिंग अॅपवर झालेल्या ओळखीतून तरुणाला एकांत जागी नेऊन चौघांनी जीव मारण्याची धमकी देऊन सोन्याचे दागिने, रोकड जबरदस्तीने काढून घेऊन लुबाडले.
याबाबत वाघोली येथील एका २७ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राहील या तरुणासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शितल पेट्रोल पंपासमोरहून ते पानसरेनगर येथील भारती वेदांत इंटरनॅशनल स्कुलचे समोरील मैदानामध्ये ११ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा जेंडर नावाचे समलिंगी डेटिंग अॅप पहात होते. त्यावेळी या अॅपवरील अएम टॉप नावाच्या आयडीवरुन व्हॉटसअॅपवर मेसेज आला. फिर्यादी याने त्यावर कॉल करुन तुझे नाव काय, कोठे राहतो, असे विचारले. त्याने त्याचे नाव राहिल असे सांगितले. त्यानंतर त्याने हुकअपसाठी भेटण्याकरिता कोंढव्यातील शितल पेट्रोल पंप येथे भेटायला बोलवले. ते तेथे गेले असताना राहिल व त्याच्या तीन साथीदाराने फिर्यादी यांना लोखंडी हत्याराने मारण्याची धमकी दिली. त्यांना पानसरेनगरमधील भारती वेदांत इंटरनॅशनल स्कुलचे समोरील मैदानामध्ये नेले. तेथे त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील मोबाईल, सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम व एटीएममधून पैसे काढायला लावून ती रक्कम असा ८० हजार ३०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला होता. त्यांनी धमकी दिल्याने फिर्यादी तरुणाने घाबरुन हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. शेवटी त्यांनी मंगळवारी कोंढवा पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक रवि गावडे तपास करीत आहेत.
