Pune PMC News | पुण्याचे महापौर आणि उपमहापौर 6 फेब्रुवारीला निवडले जाणार
पुणे : Pune PMC News | महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरची पहिली विशेष सभा म्हणजेच महापौर व उपमहापौर निवडणूक सभा घेण्याबाबत विभागीय आयुक्तांकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता.
तारिख, वेळ आणि सभेच्या अध्यक्षस्थानी पिठासीन अधिकारी यांच्या नियुक्तीसंदर्भात झालेल्या चर्चेनंतर, शुक्रवार, दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी महापौर व उपमहापौर निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही पहिली विशेष सभा शुक्रवार, 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या सभेचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे.
