Pune Crime News | एकाच प्रभागातून निवडून आलेल्या 2 भाजप नगरसेविकांच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्लेक्स लावण्यावरुन हाणामारी; पोलिसांनी दोन्ही गटांवर दाखल केले गुन्हे

Pune Crime News | Fight between workers of 2 BJP corporators elected from the same ward over putting up flex; Police register cases against both groups

पुणे : Pune Crime News | दोघीही भाजपच्या एकाच प्रभागातील उमेदवार, महापालिका निवडणुकीत त्यांनी एकत्र प्रचार केला. दोन्हीही निवडून आल्या. निवडून आल्यानंतर फ्लेक्स लावल्यावरुन त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. दोघांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या. खडक पोलिसांनी दोघींच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना काशेवाडीमधील सुदर्शन चौकात २२ जानेवारी रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली.

प्रभाग क्रमांक २२, कासेवाडी-डायस प्लॉट येथून भाजपच्या मृणाल कांबळे आणि अर्चना पाटील या निवडून आल्या. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झाली आहे.

याबाबत सतीश भिमराव साठे (वय ४३,रा. राजीव गांधी हौसिंग सोसायटी, काशेवाडी, भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शंतनु कांबळे, वैभव कांबळे, दादा मांढरे व इतर दोघांवर गर्दी जमवून मारामारी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश जयंतीनमित्त कार्यक्रम असल्याने मंदिराच्या समोर आरोपी बॅनर लावत होते. या बॅनरमुळे वाहतूकीस अडथळा होईल, म्हणून सतीश साठे यांनी मंदिरासमोर बॅनर लावण्यास विरोध केला. आरोपी यांनी त्याचा राग मनात धरुन सतीश साठे व युवराज अडसुळ यांना शिवीगाळ केली. बॅनर बांधण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी हत्यार, लाकडी बांबु व लोखंडी पाईप यांनी मारहाण करुन जखमी केले. अशी फिर्याद तुषार पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी दिली.

त्याविरोधात नगरसेविका मृणाल कांबळे यांचे भाऊ शंतनु पांडुरंग ऊर्फ बापू कांबळे (वय ३०, रा. एस आर ए बिल्डिंग, लोहियानगर) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी युवराज अडसूळ, अक्षय अडसूळ, सतीश साठे, विक्रम खेनट (सर्व रा. काशेवाडी), प्रविण फैजी, राहुल मोहिते (रा. लोहियानगर) व इतर ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार काशेवाडी येथील अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाचे शेजारी तुषार पाटील यांचे पाटील चौक येथे २२ जानेवारी रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृणाल कांबळे यांचा फोटो असलेला लावलेला फ्लेक्स व बॅनर लावत असताना तुषार पाटील यांचे कार्यकर्ते व त्यांच्या सोबत असलेल्या इतर ७ ते ८ जणांनी बॅनर लावण्याच्या कारणावरुन बापू कांबळे यांना लाथबुक्क्यांनी मारहाण केली. हाताने पोटात व तोंडावर मारहाण केली. सतीश साठे याने बॅनर लावू नये, म्हणून बापू कांबळे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम तपास करीत आहेत.

You may have missed