Kajaliwali Movie News | अभिनेता निखिल कोष्टी आणि आचल चव्हाणचं “काजळवाली” गाणं प्रदर्शित, जळगावच्या सुंदरश्या गावात झालं गाण्याचं चित्रीकरण!
Kajaliwali Movie News | जळगावच्या मातीतला मराठमोळा अभिनेता निखिल कोष्टी मराठी संगीत इंडस्ट्रीमध्ये आपलं स्वतःच स्थान निर्माण करू पाहत आहे, त्याच्या “नाद तुझा लागला”, “मामाच पत्र हरवलं” आणि “बाप्पा तुझी आस” या गाण्याच्या यशानंतर अभिनेता, गीतकार आणि निर्माता म्हणून त्याचं नवं “काजळवाली” हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. अभिनेता निखिल कोष्टी आणि अभिनेत्री आचल चव्हाण यांनी या गाण्यात काम केलं आहे. तर या गाण्याचे दिग्दर्शन प्रेम बडगुजर यांनी केलं आहे. हे गाण मयूर मोरेने गायलं असून गाण्याच संगीत विजय धुमाळ याने केल आहे. तिच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी तो स्वतःची स्वप्न विसरला पण जेव्हा ती वकील होऊन गावात परतली तेव्हा खऱ्या अर्थाने त्याच्या कष्टाच फळ मिळालं. एक सुंदर संदेश देत एका गावातली अनोखी प्रेमकथा या गाण्यामधून मांडली आहे. सध्या या गाण्याला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे.
निखिल कोष्टी या गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतात,”मी मूळचा जळगावचा आहे. मला लहानपणापासूनच संगीताची खूप आवड आहे. माझ्या “नाद तुझा लागला”, “मामाचं पत्र हरवलं” आणि “बाप्पा तुझी आस” या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मी काजळवाली हे गाणं घेऊन आलो आहे. आणि हे गाणं ही प्रेक्षकांना आवडत आहे. या गाण्याची गंमत अशी की मी २ वर्षापूर्वी एका कार्यक्रमाला गेलेलो तेव्हा मी तिथे एका सुंदर मुलीला पाहील. तिने डोळ्यात काजळ लावल्यामुळे ती अधिक सुंदर दिसत होती. त्यावरून मला या गाण्याच्या ओळी सुचल्या आणि मी ठरवलं आताच्या जेन झी यूथला साजेस अस गाण आपण बनवायचं. तुम्हाला हे गाण आवडलं असेल तर आम्हाला नक्की सांगा. माझ्या सर्व गाण्यांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम करावं अशी मी आशा व्यक्त करतो.”
दिग्दर्शक प्रेम बडगुजर गाण्याच्या चित्रीकरणाविषयी सांगतात, “जेव्हा निखिलने मला हे गाण शूट करण्यासाठी विचारलं तेव्हा मी ठरवलं की हे गाण थोड गावरान स्टाइलने शूट करायचं. आम्ही या गाण्याचं शूट जळगावमधील एका सुंदर गावात करायचं ठरवलं. गावात रखरखत्या उन्हात गाण्याच्या टीमने आणि कलाकारांनी गाण्याच शूट केलं. सोशल मीडियावर गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ते पाहून समाधान मिळत आहे.”
