Pune Crime News | प्रतिबंधीत ई सिगारेट, हुक्का ! 6 ठिकाणी छापे घालून साडेआठ लाखांचा माल अंमली पदार्थ विरोधी पथकाने केला जप्त़
पुणे : Pune Crime News | नशामुक्त पुणे अभियानाअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाने प्रतिबंधित ई सिगारेट (वेप) आणि तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर याचा साठा करुन विक्री करणार्या दुकानावर धडक कारवाई केली असून ६ ठिकाणी छापे मारले. त्यात ८ लाख ३२ हजार ९६० रुपयांचा माल जप्त केला आहे.
या कारवाईमध्ये लष्कर व कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन परिसरात इलेक्ट्रॉनिक सिगारेट उत्पादन आयात निर्यात वाहतूक विक्री साठवणुक व जाहिरात प्रतिबंध अधिनियमाखाली ३ गुन्हे दाखल करण्यात आले.
कोथरुड व लष्कर परिसरात तंबाखुजन्य हुक्का फ्लेवरची विक्री करणार्या दुकानदारावर एकूण ३ खटले दाखल करण्यात आले आहेत. तसेच ८९५ तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर जप्त केले आहेत.
हुसेन अब्दुल रहेमान (वय २५, रा. कोरेगाव पार्क), हसन शेख (वय ४२, रा. महात्मा गांधी रोड, कॅम्प), अब्दुल इस्माई जाबीर (वय २८, रा. मोलेदिना रोड, कॅम्प) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, प्रशांत अन्नछत्रे, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड, पोलीस अंमलदार राजस शेख, संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, सुनिल महाडिक, गणेश गोसावी, अमोल जगताप, संदिप देवकाते, देविदास वांढरे, दिनेश बास्टेवाड, महेश बोराडे, शुभांगी म्हाळसेकर यांनी केली आहे.
