Pune Crime News | पैशाच्या वादातून मित्राने केला साथीदारांच्या मदतीने मित्राचा खुन; दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने 12 तासात आरोपींच्या आवळल्या मुसक्या

Pune Crime News | Friend kills friend with help of accomplices over money dispute; Anti-Robbery and Vehicle Theft Squad nabs accused in 12 hours

पुणे : Pune Crime News | पैशांच्या वादातून मित्राने साथीदारांच्या मदतीने मित्राच्या डोक्यात दगड घालून चेहरा विद्रुप करुन खुन केला. खुन झालेल्याचे नावही निष्पन्न झाले नव्हत. असे असताना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने खुन झालेल्याचे नाव निष्पन्न करुन चौघा आरोपींच्या १२ तासांच्या आत मुसक्या आवळल्या.

राजेंद्र सुभाष ऐलगच्चे (वय ४०, रा. स्वराज आर्केड, आंबेगाव) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी शुभम राजेश शिंदे Shubham Rajesh Shinde (वय २५, रा. ताकवले कॉम्प्लेक्स, सिंहगड रोड, नांदेड सिटी), लकी सुरेंद्र सिंग Lucky Surendra Singh (वय २३, रा. खडकी अ‍ॅम्युनेशन फॅक्टरी), सुनिल संतोष खलसे ऊर्फ एस के Sunil Santosh Khalse alias SK (वय १९, रा. संभानगर झोपडपट्टी, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर) यांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

वारजे येथील आकाशनगर जवळील वन विभागाच्या टेकडीवरील सिमेंटच्या विसाव्या शेजारील निर्जन जागेत एकाचा मृतदेह वारजे पोलिसांना २३ जानेवारी रोजी मिळाला होता. कोणीतरी त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी मारुन तसेच दगडाने चेहरा चेंबवून त्यांचा खुन केला होता. त्याची ओळख पटली नव्हती. वारजे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्याचा गुन्हे शाखा समांतर तपास करीत होते. सहायक फौजदार बाळु गायकवाड व पोलीस अंमलदार साई कारके यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की, गणपती माथा ते शिंदे पुल वारजे दरम्यान दोन संशयित थांबले असून त्यांची काहीतरी गुन्हा केल्याचे त्यांच्या हालचाली व बोलण्यावरुन वाटत आहे. या बातमीची खात्री करण्यासाठी पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे , सहायक पोलीस निरीक्षक वर्षा कावडे व अंमलदार तेथे गेले. पोलिसांना पाहून ते पळून जाऊ लागले. तेव्हा पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन पकडले. त्या दोघांना ताब्यात घेतले़. त्यांच्याकडील माहितीवरुन अन्य दोघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे चौकशी केल्यावर राजेंद्र ऐलगच्चे यांनी एकाला १८ लाख रुपये दिले होते. ती वसुली करुन देतो, असे सांगून शुभम शिंदे याने ११ लाख रुपये घेतले होते. हे पैसे राजेंद्र ऐलगच्चे मागत होता. राजेंद्र ऐलगच्चे याला संपविले तर आपल्याला पैसे द्यावे लागणार नाही, असे समजून त्याने साथीदारांना मदतीला घेतले़ राजेंद्र ऐलगच्चे यांना वारजे येथील शनि मंदिर टेकडी येथे २१ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता बोलवले. त्याप्रमाणे राजेंद्र ऐलगच्चे तेथे आले. तेव्हा शुभम व त्याच्या साथीदारांनी लोखंडी हत्याराने गळ्यावर, छातीवर, पोटावर, पायावर वार केले. डोक्यात दगड घालून त्यांचा चेहरा विद्रुप करुन टाकला. आरोपींना पुढील कारवाईसाठी वारजे माळवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे, सहायक पोलीस निरीक्षक वर्षा कवडे, सहायक फौजदार बाळु गायकवाड, पोलीस हवालदार गणेश ढगे, निनाद माने, अजित शिंदे, प्रदीप राठोड, दत्तात्रय पवार, रवींद्र लोखंडे, रेहाना शेख, साधना पवार, पोलीस अंमलदार महेश पाटील, साईकुमार कारके, अमित गद्रे, शिवाजी सातपुते यांनी केली आहे.

You may have missed